Skip to content
October 10, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लोकाधिकार सेना महासंघाने तरुणांचा ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ बनावे; तरुणांच्या गळ्यातील ताईत व्हावे – एकनाथ शिंदे

लोकाधिकार सेना महासंघाने तरुणांचा ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ बनावे; तरुणांच्या गळ्यातील ताईत व्हावे – एकनाथ शिंदे

S9 TV NEWS October 9, 2026
Like, Follow, Subscribe

भूमिपुत्रांच्या रोजगारासोबत कौशल्य विकास, स्टार्टअप आणि नव्या संधींवर भर देण्याचे आवाहन

लोकाधिकार सेना महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाने केवळ भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी लढणारी संघटना न राहता तरुणांना दिशा देणारा ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ बनावे. रोजगार, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार आणि नव्या तंत्रज्ञानातील संधींबाबत मार्गदर्शन करून महासंघाने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार राहुल शेवाळे, मंत्री भरत गोगावले, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव संजय म्हशिलकर, चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक लोकाधिकार समितीच्या अध्यक्ष गोमती पाचभाई, राजा रामदवार यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.
शिवसेनेच्या स्थापनेमागे मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावे आणि हक्कांसाठी लढता यावे हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता. बँका, विमा कंपन्या, एलआयसीसह विविध क्षेत्रांत स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचे काम स्थानिक लोकाधिकार समितीने केले. आता रोजगाराचे स्वरूप बदलले असून रोबोटिक्स, एआय, कोडिंग, डेटा सायन्स, डिजिटल सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक्स आणि स्टार्टअप क्षेत्रांकडे तरुणांना वळवावे, असे शिंदे यांनी सांगितले.
‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे हात तयार करा’, या बाळासाहेबांच्या विचारानुसार तरुणांनी स्वयंरोजगार व उद्योगाकडे वळावे. गडचिरोलीतील सूरजागड प्रकल्पामुळे सुमारे २५ हजारांना रोजगार मिळाला असून टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने दरवर्षी सुमारे पाच हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस भरतीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत ‘मिशन खाकी’च्या माध्यमातून मैदान, अभ्यासिका, प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. विविध भरतींकडे लोकाधिकार महासंघाने लक्ष देऊन तरुणांना मार्गदर्शन करावे. स्थानिकांना रोजगार मिळवून देताना ‘शिवसेना स्टाईल’ म्हणजे मारामारी नव्हे, तर संवाद, निवेदन आणि संघटनात्मक ताकदीने न्याय मिळवून देणे होय, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेसोबत महिलांना ‘लखपती बहीण’ बनविणे, बचत गट व उद्योगांना प्रोत्साहन, तसेच दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग आणि विविध पायाभूत प्रकल्पांमुळे उद्योग व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका मांडल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी जगभर पोहोचलेल्या मराठी माणसाचा अभिमान व्यक्त केला. शिवसेना-भाजप युती ही विचार आणि विकासाची युती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांना ‘कमी बोला, जास्त काम करा’ असा सल्ला देत शिंदे म्हणाले, “लोकाधिकार महासंघाने येणाऱ्या काळात तरुणांचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड बनले पाहिजे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत महासंघ बनला पाहिजे आणि तरुणांनीही महासंघाला आपल्या गळ्यातील ताईत बनवले पाहिजे.”

…….

Continue Reading

Previous: डॉ दिपक केदार यांची राज्याध्यक्षपदी निवड
Next: नात्यांची बदलती गणितं सांगणाऱ्या ‘अफरातफरी’ मधील ‘जालिम दुनिया’ गाणं प्रदर्शित!
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×