Skip to content
October 9, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • मनोरंजन
  • नात्यांची बदलती गणितं सांगणाऱ्या ‘अफरातफरी’ मधील ‘जालिम दुनिया’ गाणं प्रदर्शित!

नात्यांची बदलती गणितं सांगणाऱ्या ‘अफरातफरी’ मधील ‘जालिम दुनिया’ गाणं प्रदर्शित!

S9 TV NEWS October 9, 2026
Like, Follow, Subscribe

पैशांचा खेळ, नात्यांमधली बदलती गणितं आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ अशी मनोरंजक पार्श्वभूमी असलेल्या आगामी मराठी चित्रपट ‘अफरातफरी’ची उत्सुकता अधिकच वाढत आहे. याच बदलत्या मानवी स्वभावावर मिश्कील अंदाजात भाष्य करणारं ‘जालिम दुनिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘जालिम दुनिया’ या गाण्याला त्याच्या विषयाला साजेसं संगीत देण्यात आलं असून गाण्याची लय त्याला वेगळीच रंगत देते. गाण्यात ओंकार भोजने आणि नेहा खान यांची जोडी दिसत असून त्यांच्या अंदाजामुळे गाण्याची मजा आणखीनच खुलते. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री, गाण्याचा भन्नाट मूड आणि संगीताची खास लय यामुळे ‘जालिम दुनिया’ हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. हे गाणं नागेश मोर्वेकर, वरूण लिखाते आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायले असून वरूण लिखाते यांचे संगीत आणि शब्द लाभले आहेत.

गाण्याबद्दल संगीतकार वरूण लिखाते म्हणतात,“‘जालिम दुनिया’चं संगीत करताना गाण्याचा विषय आणि त्याचा स्वभाव लक्षात घेऊन त्याला साधं, सहज आणि ऐकायला मजा येईल असं संगीत देण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचा मूड हलका ठेवतानाच त्यामागचा विचारही पोहोचावा, असा आमचा प्रयत्न होता. गाणं ऐकताना प्रेक्षकांना त्यात आपल्या आजूबाजूची माणसं आणि प्रसंग कुठेतरी जाणवतील.”

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणतात, “हे गाणं चित्रपटाच्या कथेला आणि त्यातल्या व्यक्तिरेखांच्या स्वभावाला अगदी साजेसं आहे. माणसांच्या बदलत्या वागण्याकडे थोड्या मिश्कीलपणे पाहाणारं हे गाणं आहे. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल याची मला खात्री आहे.”

मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित व स्कायलाईन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेला हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, असावरी जोशी, हेमंत पाटील आणि किरण माने यांसारख्या दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

Continue Reading

Previous: लोकाधिकार सेना महासंघाने तरुणांचा ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ बनावे; तरुणांच्या गळ्यातील ताईत व्हावे – एकनाथ शिंदे
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×