Skip to content
May 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • राजकीय
  • माजी खासदार आणि परांजपे स्वगृही

माजी खासदार आणि परांजपे स्वगृही

S9 TV NEWS May 15, 2026
Like, Follow, Subscribe

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत परांजपे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

शिवसेनेत संघटनात्मक कामासाठी झोकून देणार – आनंद परांजपे

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी खासदार आनंद परांजपे १४ वर्षांनंतर स्वगृही परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रविंद्र फाटक आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

आनंद परांजपे शिवसेनेत असताना परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता पार पाडल्या असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल,असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्यात पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यात एसआयआरचे काम सुरू असून शिवसेनेने एक लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

यावेळी परांजपे म्हणाले की, घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला. शिवसेनेकडून दोनदा खासदार बनलो. त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान होते. मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए आहे, असे परांजपे म्हणाले. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम करणाऱ्या एकनाथजी शिंदे यांनी जनहिताचे अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता एकनाथजी शिंदे आणि डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वात संघटनेसाठी काम करण्याची इच्छा यावेळी परांजपे यांनी बोलून दाखवली.

Continue Reading

Previous: नरसापूर प्रकरणातील आरोपीवर जलदगतीने कारवाई करा
Next: ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंत्यदर्शन
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×