Skip to content
September 26, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आई दुर्गेश्वरीचा मंडप पूजन सोहळा उत्साहात संपन्न

ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आई दुर्गेश्वरीचा मंडप पूजन सोहळा उत्साहात संपन्न

S9 TV NEWS September 25, 2026
Like, Follow, Subscribe

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मंडप पूजन

देवीसाठी यंदा सजणार देवभूमी उत्तराखंड मधील बद्रीनाथ मंदिराचा देखावा

ठाणे :- ठाण्यातील टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचा मंडप पूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते देवीचे विधिवत मंडप पूजन करण्यात आले.

स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने सुरू करण्यात आलेल्या या नवरात्रोत्सव मंडळाचे
यंदा हे ४८वे वर्ष आहे. देवीसाठी यावर्षी देवभूमी उत्तराखंड येथील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. आज मंडप पूजन सोहळा पार पडल्यानंतर देवीच्या भव्य मंडपाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे.

दरवर्षी या नवरात्रोत्सवाला मुंबई, ठाणे, पालघर येथील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी म्हणून ही देवी ओळखली जाते. देवीच्या मुखवट्यापासून ते तिच्या डोळे आणि तिच्यावर सजलेली विविध आभूषणे अतिशय आकर्षक असल्याने भक्तांच्या कायम चर्चेचा विषय ठरतात. देवीच्या आशीर्वादाने सर्व विघ्न दूर होत असल्याची भक्तांची धारणा आहे.

आज पार पडलेल्या या मंडप पूजन सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते पवन कदम, नगरसेवक संजय वाघुले, राजेश मोरे, सुधीर कोकाटे, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, नौपाडा प्रभाग समिती सभापती सौ. मीनल संख्ये, माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी आणि कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, जॅकी भोईर, स्वानंद पवार, किरण नाकती, बाळा गवस आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

….

Continue Reading

Previous: ठामपा सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेतगुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम तर शिवगर्जना मित्र मंडळ व्दितीय
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×