Skip to content
September 24, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठामपा सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेतगुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम तर शिवगर्जना मित्र मंडळ व्दितीय

ठामपा सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेतगुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम तर शिवगर्जना मित्र मंडळ व्दितीय

S9 TV NEWS September 23, 2026
Like, Follow, Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सन 2026 सालासाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमध्ये कळवा येथील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम पारितोषिक पटकाविले. तर उथळसर येथील शिवगर्जना मित्र मंडळाने व्दितीय, वागळे येथील पवनपुत्र व्यायाम शाळा शिवसेना शाखेसमोरील सार्वजनिक उत्सव मंडळाने तिसरा क्रमांक पटकाविला. तर आझादनगर येथील जय भवानी म‍ित्र मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. महापालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी आज जाहिर केला.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. ठाणे शहरातील एकुण 23 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपला सहभाग दर्शविला होता.

        हया स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘स्वत:ला ओळखा, इतरांना समजा आणि यश मिळवा’ या विषयावर आधारीत माणसाचे विविध स्वभाव चलचित्राच्या माध्यमातून साकारले आहे. तर व्दितीय क्रमांक पटकाविणा-या शिवगर्जना मित्र मंडळाने लिप्पन आर्ट पासून तयार केलेली सुंदर सजावट सादर केली आहे. तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या वागळे येथील सार्वजनिक उत्सव मंडळाने ’नशा करी जीवनाची दशा’ यावर आधारित देखावा सादर करुन नशामुक्तीचा संदेश दिला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविलेल्या आझादनगर येथील जय भवानी मित्र मंडळाने ‘भविष्य वाचवा’ (नरसापूर येथील घटना व बदलापूर येथील घटना) यावर आधारित देखावा सादर केला आहे.  या आरास स्पर्धेचे परीक्षण शिल्पकार सदाशिव कुलकर्णी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी केले.

     ठाणे महापालिकेतर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत देखावा-आरास, स्वच्छता आणि मूर्तीकार असे तीन विभाग आहेत. या तिन्ही विभागातील निकाल पुढीलप्रमाणे

आरास स्पर्धा : प्रथम क्रमांक : रोख पारितोषिक रु. 25 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुणसागर नगर, कळवा ठाणे, द्वितीय क्रमांक : रोख पारितोषिक रु. 20 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – शिवगर्जना मित्र मंडळ, उथळसर, ठाणे. तृतीय पारितोषिक रु. 15 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मापत्र – सार्वजनिक उत्सव मंडळ, पवनपुत्र व्यायाम शाळा, शिवसेना शाखेसमोर, वागळे इस्टेट ठाणे. उत्तेजनार्थ रोख पारितोषिक रु. 10 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – जयभवानी मित्र मंडळ, आझादनगर, ठाणे.

स्वच्छता पुरस्कार : प्रथम क्रमांक रोख पारितोषिक रु. 10 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – झकास सोशल फाऊंडेशन, लोकमान्यनगर पाडा नं. 1, द्वितीय क्रमांक रोख पारितोषिक रु. 7 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – चैतन्य मित्र मंडळ, देव अशोका टॉवर, वागळे इस्टेट, ठाणे, तृतीय क्रमांक रोख पारितोषिक रु. 5 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – गोपाळ गणेश मित्र मंडळ, आझादनगर नं. 2 भवानी नगर, जरीमरी मंदिर मागे ठाणे प.

उत्कृष्ट मुर्तीकार : प्रथम क्रमांक रोख पारितोषिक रु. 10 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – नरेश पोहेकर/ सुशांत पोहेकर, पोहेकर आर्टस, काजूवाडी वैतीनगर रहिवाशी मित्र मंडळ ठाणे. द्वितीय क्रमांक रोख पारितोषिक रु. 7 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – सप्तदिप पाटील – रिव्हरवुड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ, खिडकाळी ठाणे. तृतीय क्रमांक रोख पारितोषिक रु. 5 हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र – श्री विनोद जोमा भोईर शिवसम्राट मित्र मंडळ.

Continue Reading

Previous: वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×