Skip to content
August 15, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाणे महापालिकेच्यावतीने 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्यावतीने 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

S9 TV NEWS August 15, 2026
Like, Follow, Subscribe

सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या शुभहस्ते महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि टीडीआरएफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ध्वजारोहण सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कणसे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा जयश्री डेव्हिड, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, काजल गुणिजन, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरिश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या १० प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यात, प्रविण श्रीराम बनोटे, दिपक लक्ष्मण कोंडुळे, लागून कृष्णा नाडार, अशोक धोडिंबा पाटील, दिपाली अशोक खाजेकर, शालूबाई गोविंद धोत्रे, आत्माराम बाबू पाटील, सोनल सुनिल पाटील, अनिल तुळशीराम कदम, माधुरी धनावडे, सुनिता दुधाम सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी, उपायुक्त (घनकचरा) मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी, महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचेही आयुक्त राव यांनी नमूद केले.
ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांना, तसेच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

Continue Reading

Previous: 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×