Skip to content
July 30, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘ शूटिंग रेंज ‘ इमारत;

ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘ शूटिंग रेंज ‘ इमारत;

S9 TV NEWS July 29, 2026
Like, Follow, Subscribe

शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली!

राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले “ठाणे शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करताना केवळ पायाभूत सुविधांचा विस्तार पुरेसा नाही, तर युवकांना प्रशिक्षण, खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि नागरिकांना विविध उपक्रमांसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरानंदानी इस्टेट जवळील मोजे वाघबीळ येथे उभारण्यात येणारे हे सुविधा भवन त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल,”

प्रस्तावित प्रकल्पासाठी २०२०.४८ चौ.मी. क्षेत्रफळाचा सुविधा भूखंड असून, सुमारे ४५२२.०५ चौ.मी. बांधकाम क्षेत्रात बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. बेसमेंटमध्ये ३० चारचाकी आणि ५० स्कूटरसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तळमजल्यावर ट्रेनिंग हॉल, कॅफे, किचन, प्रसाधनगृह, शस्त्र-साहित्य वाटप कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालय प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर १० मीटर शूटिंग रेंजची ११ लेन, ६५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, ट्रेनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल आणि प्लेअर लाऊंज असणार आहे.

दुसऱ्या मजल्यावर २५ मीटर शूटिंग रेंजच्या १० लेन, ५५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष, स्टोअर रूम आणि प्रसाधनगृह; तर तिसऱ्या मजल्यावर ५० मीटर शूटिंग रेंजच्या ८ लेन, ४० प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

“ठाण्यातील नेमबाजीपटूंना दर्जेदार सराव आणि प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यासाठी सक्षम पायाभूत व्यवस्था निर्माण व्हावी, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. ठाण्याच्या क्रीडा विकासाला नवी ओळख देणारे केंद्र म्हणून हे सुविधा भवन विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Continue Reading

Previous: ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×