Skip to content
July 12, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड

शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड

S9 TV NEWS June 19, 2026
Like, Follow, Subscribe

ठाणे ग्रामीण पोलिस दलातील खेळाडू शीतल मल्लिकार्जुन खरटमल हिने व्हिएतनाममधील दा नांग येथे आयोजित युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) आशियाई आणि ओशनिया हौशी एमएमए व पँक्रेशन चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून ठाणे ग्रामीण पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे ठाणे ग्रामीण पोलिस दलासह क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
७ ते ९ जून २०२६ या कालावधीत व्हिएतनाममधील दा नांग येथे ही स्पर्धा पार पडली. वरिष्ठ, यू-२०, यू-१७ आणि यू-१५ गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शीतल खरटमल हिने वरिष्ठ गटातील एमएमएच्या ६५ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक मिळविले. जगभरातील अव्वल खेळाडूंमध्ये आपली छाप पाडत तिने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. शीतलच्या या यशाची दखल घेत ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय संघाचे प्रमुख अमर मुख्तार तांबोळी आणि संघ प्रशिक्षकांनीही तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे, शीतल खरटमलची पुढील वर्षी किर्गिस्तान येथे होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील नामांकित खेळाडू सहभागी होणार असून शीतलला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. तिच्या या यशामुळे ठाणे ग्रामीण पोलिस दलासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.

Continue Reading

Previous: सीए परीक्षेत श्रेयश शिंदे यांचे नेत्रदीपक यश….
Next: रक्ताने नाही, विचारांनी ठरतो वारस; शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×