Skip to content
June 5, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रिक्षातून घुमणार मराठीचा आवाज; ठाण्यात विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू

रिक्षातून घुमणार मराठीचा आवाज; ठाण्यात विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू

S9 TV NEWS June 5, 2026
Like, Follow, Subscribe
  • महाराष्ट्र माझा, मराठी माझी : परिवहन विभागाचा रिक्षाचालकांसाठी अभिनव उपक्रम

प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा, मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढावा आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीशी रिक्षाचालकांची अधिक जवळीक निर्माण व्हावी, या उद्देशाने परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी संवाद भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनुभवी प्राध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसांचे विशेष प्रशिक्षण सत्र राबविण्यात येणार असून, रिक्षाचालकांना प्रवाशांशी नम्र, प्रभावी आणि आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधण्याचे कौशल्य शिकविण्यात येणार आहे.

दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या वाक्यरचना, ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत, मराठी शब्दसंग्रह आणि भाषेचे मूलभूत ज्ञान यांची ओळख या प्रशिक्षणाद्वारे करून दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी रिक्षाचालकांची मराठी संभाषण परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेत यशस्वी ठरलेल्या चालकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

ठाणे शहरात विविध राज्यांमधून आलेले रिक्षाचालक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत प्रवासी आणि चालक यांच्यातील भाषेची दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रदीप ढवळ यांच्यासह अरुण म्हात्रे, ज्योती ठाकरे, दीपा ठाणेकर, , हर्षला लिखिते आणि गौतम थोरवे उपस्थित होते.

*

ठाणे आरटीओच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून मराठी संवाद भाषा अवगत नसलेल्या रिक्षाचालकांचा शोध घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार अशा चालकांसाठी मराठी संवाद भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे वर्ग १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.

Continue Reading

Previous: ठाणे परिवहनच्या ई-बस, डबल डेकर ई-बस व सीएनजी बस प्रकल्पाचा महापौरांकडून आढावा
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×