Skip to content
June 5, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाणे परिवहनच्या ई-बस, डबल डेकर ई-बस व सीएनजी बस प्रकल्पाचा महापौरांकडून आढावा

ठाणे परिवहनच्या ई-बस, डबल डेकर ई-बस व सीएनजी बस प्रकल्पाचा महापौरांकडून आढावा

S9 TV NEWS June 4, 2026
Like, Follow, Subscribe

चार्जिंग स्टेशन उभारणीला गती; डबल डेकर बस लवकरच प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न

ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बससह आगामी ई-बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी गुरुवारी वागळे येथील परिवहन आगारात घेतला. वागळे आगारातील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करणे, तसेच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबतही महापौरांनी अधिका-यांसोबत चर्चा केली.

यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक अनिल भोर, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे परिवहन सेवेतील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बसचे लोकार्पण करण्यात आले होते. या बसची प्रात्यक्षिक चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सध्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या बसच्या परिचलनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

बैठकीदरम्यान ई-बस, डबल डेकर ई-बस तसेच आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डबल डेकर ई-बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक जागा, वीजपुरवठा आणि तांत्रिक बाबींचे नियोजन करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले

डबल डेकर बस आणि नव्याने दाखल होणाऱ्या ई-बस व सीएनजी बसांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. काही तांत्रिक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून त्याबाबत संबंधित विभाग, महावितरण आणि ठेकेदार संस्थांशी समन्वय साधला जात आहे. चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी थोडा कालावधी लागू शकतो, मात्र बस सेवा लवकर सुरू करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांचाही विचार केला जात असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे परिवहन सेवेत आगामी काळात डबल डेकर ई-बस तसेच शंभर सीएनजी बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बस आगारातील कामे, चार्जिंग स्टेशन उभारणी, सीएनजी सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. ठेकेदार संस्थेला चार्जिंग स्टेशन उभारणी, बस उपलब्धता आणि सेवा सुरू करण्याबाबतच्या जबाबदाऱ्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत चर्चा केली असल्याचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केले.

संबंधित अधिकाऱी तसेच ठेकेदार संस्थेला प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी यावेळी दिले. तसेच महावितरण आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून चार्जिंग स्टेशन उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रशासनाने यावेळी नमूद केले.

Continue Reading

Previous: ‘ठाणे महानगरपालिका -क्रिस्टल हाऊस’ सीबीएससी शाळा 8 जूनपासून खारेगाव येथे सुरू होणार
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×