Skip to content
October 13, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • मनोरंजन
  • ५ फेब्रुवारीला रंगणार नात्यांची भन्नाट गोष्ट

५ फेब्रुवारीला रंगणार नात्यांची भन्नाट गोष्ट

S9 TV NEWS October 12, 2026
Like, Follow, Subscribe

प्रेम, नाती आणि भन्नाट गोंधळाची गोष्ट ‘सासरे बापरे’!
.

प्रेमकथा म्हटलं की, सगळं काही सुरळीत आणि परफेक्ट असावं, असं नाही. प्रेमासोबत येणारा गोंधळ, नात्यांमधले मतभेद, एकमेकांना समजून घेण्याची धडपड आणि या सगळ्यात कुटुंबाची होणारी मजेशीर घुसमट… अशाच काहीशा भन्नाट आणि हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन ‘सासरे बापरे’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा झाली असून ‘सासरे बापरे’ हा चित्रपट येत्या ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!’ अशी कॅची ओळ घेऊन येणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षकच उत्सुकता वाढवणारं आहे. नावातला मिश्कीलपणा आणि त्यामागची कौटुंबिक गोष्ट यामुळे ‘सासरे बापरे’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता पहिल्याच घोषणेत निर्माण झाली आहे. प्रेम आणि नात्यांच्या या गोष्टीत विनोदाची रंगत असली, तरी माणसांच्या भावविश्वाकडे आणि मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडेही संवेदनशील नजरेने पाहाण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

भरत जाधव म्हणजे विनोदाचा अचूक टायमिंग.. आणि या सिनेमात विनोदा सोबत आतापर्यंत त्यांच्या न पाहिलेल्या छटा अनुभवायला मिळणार आहेत.. भरत जाधव यांच्या अभिनयाचा हा नवा रंग प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी असेल. भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी, मिलिंद गवळी, विजय निकम, अश्विनी महांगडे, रेणूका दफ्तरदार, प्रफुल्ल सामंत, चंद्रशेखर सांडवे, संदीप गायकवाड, प्रियंका हांडे अश्या दमदार कलाकारांची फळी आणि सोबतच एका वेगळ्या भूमिकेत उपेंद्र लिमये यांना पाहताना येणारी मजा ‘सासरे बापरे’च्या कथेला आणखी रंगतदार बनवणार आहे.

दिग्दर्शक विशाल विलास सुर्वे म्हणतात, ”प्रेमकथा म्हणजे एखादी परफेक्ट व्यक्ती शोधण्याची गोष्ट नाही. तर अपूर्ण, अनपेक्षित आणि तरीही खऱ्या व्यक्तीवर प्रेम करण्याचं धैर्य म्हणजे प्रेम. ‘सासरे बापरे’मधून गोंधळाच्या परिस्थितीतही नात्यांमध्ये टिकून राहाण्याची ताकद आणि माणसांमधली हळुवार बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी चित्रपटांनी नेहमीच गजबजलेल्या घरातलं माणूसपण आणि त्यातील उबदारपणा सुंदरपणे मांडला आहे. त्याच उबदारपणातून मानसिक आरोग्यासारख्या विषयाकडे पाहाण्याचा हा प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना हसवेल, भावूक करेल आणि कदाचित आपल्या जवळच्या माणसांकडे थोडं अधिक संयमाने पाहायला लावेल.”

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकेत तांडेल यांचे आहेत. मुश्ताक खान प्रस्तुत आणि चेतन जगन्नाथ शिंदे, विशाल विलासिनी सुर्वे, सचिन शिंदे, प्रीत शिंदे, मुश्ताक खान, मोहसिन खान, सत्या अय्यर या चित्रपटाचे निर्माते असून सुनील जागेटिया, विनोद रामचंद्र गुरसळे आणि आकाश रवींद्रनाथ गुरसळे सहनिर्माते आहेत. एलएससीए क्रिएटिव्हज, सिंधिया एंटरटेनमेंट, सिनेमॅटिक किडा, सरवणा स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विलास सुर्वे यांनी केले आहे. सोबतच चेतन जगन्नाथ शिंदे यांनी छायाचित्रणाची बाजू साभाळली आहे.

प्रेम, कुटुंब, नात्यांमधली गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमती-जमतींचा हा अनोखा प्रवास ५ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. त्यामुळे ‘सासरे बापरे’मध्ये नेमकी कोणाची लव्हस्टोरी आणि कोणाचा बापरे, असा अनुभव देणारा गोंधळ आहे, हे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे ५ फेब्रुवारीची.

Continue Reading

Previous: नात्यांची बदलती गणितं सांगणाऱ्या ‘अफरातफरी’ मधील ‘जालिम दुनिया’ गाणं प्रदर्शित!
Next: घटस्थापनेच्या दिवशी टेंभी नाक्याच्या आई दुर्गेश्वरीचे मोठ्या उत्साहात आगमन
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×