Skip to content
October 13, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • घटस्थापनेच्या दिवशी टेंभी नाक्याच्या आई दुर्गेश्वरीचे मोठ्या उत्साहात आगमन

घटस्थापनेच्या दिवशी टेंभी नाक्याच्या आई दुर्गेश्वरीचे मोठ्या उत्साहात आगमन

S9 TV NEWS October 12, 2026
Like, Follow, Subscribe

देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे नवरात्र मंडळांना आवाहन

नवरात्रोत्सवाच्या उत्साहात यंदा टेंभी नाक्याच्या देवीसमोर बळीराजासाठी साकडे घालण्यात आले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना करतानाच या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील; केंद्र सरकारकडूनही भरीव मदत मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचवेळी नवरात्रोत्सव मंडळांनीही उत्सवातील काही बचत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचा आगमन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी आई दुर्गेश्वरीची ढोल ताशे, लेझीम, टाळ मृदंग, कोळी नृत्य, गोंधळ नृत्य, आदिवासी तारपा नृत्य आणि इतर पारंपरिक कलाप्रकार सादर करून भव्य मिळवणूक काढण्यात आली. यानंतर देवीचे टेंभी नाका येथील मंडपात विधिवत पूजन करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.
यावेळी बोलताना, दुष्काळग्रस्त भागात केंद्राचे पथक पाहणी करून गेले असून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची आढावा बैठक आज पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता त्यांनीही महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. केंद्र सरकारही मोठ्या प्रमाणात सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पूर्ण करण्यात आली असून सवलती आणि नुकसानभरपाईसोबतच संकटग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मुलींचे ठरलेले विवाह हा देखील गंभीर विषय असून सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी शिवसेनेकडून उचलली आहे. मराठवाड्यातील २५ हजार शेतकरी कुटुंबातील मुलींना सायकली आणि २५ हजार महिलांना शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ परभणीतून करण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मंडळाने यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार आहे. इतर मंडळांनीही अशाच प्रकारे काही बचत करून बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. “बळीराजाची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे यंदा हे ४८वे वर्ष आहे. यंदा देवभूमी उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देवीच्या या सोहळ्यात
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे पोलिसातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी खासदार नरेश म्हस्के,आमदार रवींद्र फाटक, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना राज्य संघटनप्रमुख आनंद परांजपे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, जॅकी भोईर, स्वानंद पवार, किरण नाकती, बाळा गवस, अमित जयस्वाल आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…..

Continue Reading

Previous: ५ फेब्रुवारीला रंगणार नात्यांची भन्नाट गोष्ट
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×