Skip to content
October 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

S9 TV NEWS October 27, 2026
Like, Follow, Subscribe

नाशिकच्या विकासाला कुंभमेळ्यामुळे मिळणार नवी गती — एकनाथ शिंदे

*गंगापूर रोडवरील रस्त्याच्या भूमिपूजनासह कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन…

रस्ते, पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला नवी गती मिळत असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा सर्वांगीण कायापालट होणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गंगापूर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच कर्मवीर अॅडव्होकेट बाबुराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गंगापूरमधील रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगत शिंदे म्हणाले की, “चांगले रस्ते ही शहराच्या प्रगतीची ओळख असते. आपण स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत.” रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई झाली पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्ते व पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून, सरकारने आतापर्यंत सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार असून त्यानंतर सिंहस्थाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.

देशभरातून लाखो भाविक येणार असल्याने त्यांच्या सुविधांची जबाबदारी नाशिककरांची, तर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुष्काळाचे संकट असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसोबत कुंभाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कर्मवीर अॅडव्होकेट बाबुराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन करताना शिंदे यांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्याचे कौतुक केले. ११२ वर्षांच्या या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली असून, आज लाखो विद्यार्थी संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ घेत आहेत, असे ते म्हणाले.

खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि घरासारखे वातावरण देणारे हे वसतिगृह त्यांच्या इंजिनिअर होण्याच्या स्वप्नाला बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळा आणि शिक्षणसंस्था या दोन्ही माध्यमातून नाशिकच्या भावी पिढीचा आणि शहराचा विकास घडत असल्याचे सांगत शिंदे यांनी विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेग आणि पारदर्शकता राखण्याचे आवाहन केले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्याचे निर्देश, तसेच संत कबीरनगर झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव तपासून गृहनिर्माणाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार गोकुळ गीते, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी, संस्थेचे विश्वस्त, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांना मेट्रोची आनंदवार्ता!
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×