Skip to content
October 14, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अखंड सावधान… वादळ आपल्या उंबरठ्यावर’; हिंदू जागृती मंडळाचा जनजागृतीपर देखावा

अखंड सावधान… वादळ आपल्या उंबरठ्यावर’; हिंदू जागृती मंडळाचा जनजागृतीपर देखावा

S9 TV NEWS September 21, 2026
Like, Follow, Subscribe

‘

सोशल मीडिया, दिशाभूल करणारी माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत तरुणांना सतर्क राहण्याचा संदेश

ठाणे : गणेशोत्सवाच्या माध्यमातून गेल्या ३५ वर्षांपासून विविध सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर जनजागृती करणाऱ्या हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘अखंड सावधान – वादळ आपल्या उंबरठ्यावर’ या संकल्पनेतून नागरिकांना जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. बदलत्या काळातील विविध आव्हाने आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याकडे देखाव्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे.

यंदाच्या देखाव्यात लव्ह जिहाद, लँड जिहाद, डिजिटल जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, शैक्षणिक जिहाद आणि धार्मिक जिहाद यांसारख्या विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया, आधुनिक तंत्रज्ञान, फसवणूक आणि दिशाभूल करणारी माहिती यामुळे समाजावर होणाऱ्या परिणामांचे चित्रण करण्यात आले आहे.

व्हायरल संदेशांवर विश्वास ठेवण्याआधी पडताळणीचा सल्ला

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्स, पोस्ट किंवा संदेशांवर तातडीने विश्वास न ठेवता त्यामागील सत्यता तपासावी, स्वतंत्रपणे विचार करावा आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी जबाबदारीने वागावे, असा संदेश मंडळाने तरुणांना दिला आहे. सोशल मीडिया हे माहितीचे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा वापर विवेकाने करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

‘अभ्यास, आचरण, संघटन आणि ठोस कृती’ या चतु:सूत्रीच्या माध्यमातून जागरूक नागरिकत्व, सामाजिक एकता तसेच संस्कृती आणि परंपरांचे जतन यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. समाजातील घडामोडी समजून घेताना प्रत्येकाने जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘वादळ आपल्या उंबरठ्यावर आहे; त्यामुळे डोळे उघडे ठेवून जागृत राहा’, हा यंदाच्या देखाव्याचा मुख्य संदेश आहे. मंडळाचे कार्यवाह केदार सुनील आपटे यांनी याबाबत माहिती दिली.

Continue Reading

Previous: चार पिढ्यांकडून जपली जातेय १७८ वर्षांची गौरी पूजनाची परंपरा
Next: वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×