Skip to content
August 8, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा

S9 TV NEWS August 7, 2026
Like, Follow, Subscribe

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून विरोधकांची स्टंटबाजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघाती टीका

सरकार चर्चेसाठी तयार, विरोधकांनी सभागृहात येऊन चर्चा करावी

गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा मागणे हे केवळ राजकारण

जंतर मंतरवरील आंदोलनानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. तिथले आंदोलन संपले मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून विरोधी पक्ष गृहमंत्री अमित शाहांचा राजीनाम्यासाठी संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार ज्योती वाघमारे, खासदार संजय दिना पाटील यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या खासदारांना पंतप्रधानांनी सकाळी चहापानासाठी बोलवले होते. यावेळी काळजी करु नका, मतदार संघातील विकास कामांवर लक्ष द्या, अशी ग्वाही पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार संसदेत चर्चेसाठी तयार असताना विरोधक मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनाम्यासाठी संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहेत. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असताना काँग्रेसने मात्र षडयंत्र रचत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवासस्थानी निदर्शने केली. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. ज्यांचे आंदोलन होते ते संपले आणि विद्यार्थी आपआपल्या कामात व्यस्त होते. विद्यार्थी आणि युवा हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. त्यांचा सन्मान ठेवून पंतप्रधानांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यांनी युवकांशी संवाद देखील साधला, मात्र काँग्रेस व इतर विरोधक गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेसला संसदेत चर्चेसाठी यायचे नाही पण संसदेबाहेर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी निव्वळ राजकारण करायचे आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अमित शाहांनी नक्षलवाद संपवला, जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवले, भारतातला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपवला म्हणून काँग्रेस गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतेय का, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला. गृहमंत्री अमित शाहांना दुसऱ्यांनी देशभक्ती शिकवण्याची आवश्यकता नाही. राजकीय स्टंट करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात येऊन सरकारशी चर्चा करावी. सरकार चर्चेसाठी तयार आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना केले. महिला आरक्षणासारख्या महत्वाच्या विधेयकाला सगळ्यांनी पाठिंबा द्यायला हवा. मतदार संघाची पुनर्रचना करणे ही काळाजी गरज आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने न बघता सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Continue Reading

Previous: रिंग मेट्रोबाबत सरकारचा मोठा निर्णय; जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गती
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×