Skip to content
August 6, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास सुरुवात;

ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास सुरुवात;

S9 TV NEWS July 20, 2026
Like, Follow, Subscribe

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

ठाणे जिल्ह्यातील सन २०२६-२७ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून, या स्पर्धांचे बिगुल वाजले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये आगामी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत प्रभावी आयोजन, सुटसुटीत नियोजन व कडक अंमलबजावणी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्पर्धा सर्व दृष्टीने यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, विविध सरकारी व क्रीडा विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे, स्पर्धास्थळांची योग्य तयारी करणे आणि सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवणे या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. तसेच सर्व स्पर्धा वेळेत आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती निलम वाव्हळ, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. भाऊराव मोहिते, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी श्री. अनिल कुऱ्हाडे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव श्री. अशोक आहेर, जिल्हा खो-खो संघटनेचे प्रतिनिधी श्री. विकास कोळी व श्री. कमलाकर कोळी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सदस्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

Continue Reading

Previous: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे”
Next: शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व धार्मिक स्थळांजवळीलअनधिकृत पानटपऱ्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×