Skip to content
June 28, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा ऐतिहासिक पराक्रम..

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा ऐतिहासिक पराक्रम..

S9 TV NEWS June 28, 2026
Like, Follow, Subscribe


सलग दुसऱ्यांदा पंधराच्या पंधरा जागांवर विजय; अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांना विक्रमी ३६६ मते

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ या दैवार्षिक कार्यकारिणी निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सलग दुसऱ्यांदा पंधराच्या पंधरा जागा जिंकत नवा इतिहास रचला. मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही संपूर्ण कार्यकारिणीवर परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांनी ३६६ मते मिळवत पत्रकार संघाच्या इतिहासातील सर्वाधिक मतांचा विक्रम नोंदविला. त्यांचे प्रतिस्पर्धी विष्णू सोनवणे यांना १०८ मते मिळाली.

उपाध्यक्षपदी स्वाती संजय घोसाळकर (३२४) आणि राजेंद्र हुंडे (२८९) विजयी झाले. या पदासाठी संतोष गायकवाड (१३१), रविंद्र भोजने (१०१) आणि नितीन सोनवणे (९८) यांचा पराभव झाला.

कार्यवाहपदी शैलेश शिर्के (२७०) यांनी विजय मिळविला. मंगेश वरवंडेकर यांना १०८, तर दीपक परब यांना ३७ मते मिळाली.

कोषाध्यक्षपदी शिवाजी जाधव (३३५) विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी कुलदीप थायवट यांना १३६ मते मिळाली.

विश्वस्तपदी प्रकाश कुलकर्णी (३११) विजयी झाले. अरविंद सुर्वे यांना १५० मते मिळाली.

कार्यकारिणी सदस्यांच्या नऊ जागांसाठी परिवर्तन पॅनेलचे गजानन सावंत (३०९), विनोद साळवी (२९१), आसाराम नाटेकर (२८९), दिवाकर शेजेवळकर (२८८), रजनीश राणे (२८४), अंशुमन पोयरेनकर (२७६), सारंग दर्शन (२७४), राजेश खांडे (२७३) आणि किरीट गोरे(२६८) हे विजयी झाले.

या निवडणुकीत उमा कदम (१६९), नंदकुमार पाटील (१६८), आशिष बनसोडे (१६८), महेंद्र जगताप (१६५), काशिनाथ दहाड (१६४), श्रीकांत भोसले (१४७), केतन खेडेकर (१३४), नितीन सोनवणे (१०६) आणि अमृत सुतार (१७) यांचा पराभव झाला.
आम्ही लोणावळा विश्रामधाम नुतनीकरणासह केलेल्या विकासकामांवर मतदारानी दाखविलेला हा विश्वास असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केली.

या निकालामुळे परिवर्तन पॅनेलने सलग दुसऱ्यांदा पत्रकार संघाच्या सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवण्याचा मान पटकावला असून, संघाच्या इतिहासातील हा आणखी एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. अध्यक्षपदासह सर्व प्रमुख पदांवर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सदस्यांनी त्यांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.

Continue Reading

Previous: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार, पाणीपुरवठा योजनेला देणार मंजुरी…
Next: ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×