Skip to content
April 20, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • वर्ल्ड स्पोर्ट्स फोटोग्राफी अवॉर्ड मध्ये कांस्य पुरस्कार….

वर्ल्ड स्पोर्ट्स फोटोग्राफी अवॉर्ड मध्ये कांस्य पुरस्कार….

S9 TV NEWS February 27, 2026
IMG-20260227-WA0009.jpg
Like, Follow, Subscribe

मुंबईतील क्रीडा छायाचित्रकार प्रतीक कोळी यांनी प्रतिष्ठित वर्ल्ड स्पोर्ट्स फोटोग्राफी अवॉर्ड्स २०२६ (कॅनन प्रायोजित) स्पर्धेत क्रिकेट विभागात कांस्य पुरस्कार पटकावला आहे.
त्यांनी टिपलेले हे विजेते छायाचित्र महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या ऐतिहासिक लढतीतील थरारक क्षणाचे आहे. नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयादरम्यान टिपलेला हा हवेत झेप घेतलेला अप्रतिम क्षण जागतिक स्तरावर विशेष ठरला. या स्पर्धेत जगभरातील छायाचित्रकार सहभागी होतात आणि नामांकित तज्ज्ञ परीक्षकांकडून निवड केली जाते.
प्रतीक सध्या मुंबईतील नामांकित क्रिकेट असोसिएशन्ससोबत कार्यरत असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे छायाचित्रण करत आहेत. त्यांच्या या यशामुळे मुंबई व भारताच्या क्रीडा छायाचित्रण क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला असून त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Continue Reading

Previous: महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं…..
Next: शैक्षणिक कला – क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×