Skip to content
April 21, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती….

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती….

S9 TV NEWS February 8, 2026
IMG-20260208-WA0051.jpg
Like, Follow, Subscribe

शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती आणि प्रार्थना करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला आहे. या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यभर कोणतेही सोहळे, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यानुसार राज्यात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन होणार नाहीत. तसेच शिंदे स्वतःही वाढदिवस साजरा करणार नाहीत.

त्यामुळेच शिवसेनेच्या महिला आघाडीने त्या दिवशी कोणत्याही सोहळ्याचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन न करता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी राज्यातील विविध मंदिरांमध्ये महाआरती आणि प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत, असे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.

Continue Reading

Previous: एम बी ए फाउंडेशन अव्वल….
Next: महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं…..
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×