Skip to content
June 22, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • आंतरराष्ट्रीय योग दिन ठाण्यात मोठ्या प्रमाणात साजरा….

आंतरराष्ट्रीय योग दिन ठाण्यात मोठ्या प्रमाणात साजरा….

S9 TV NEWS June 21, 2026
Like, Follow, Subscribe

संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे व समाजसेवक दत्ता घाडगे ह्यांच्या पुढाकाराने ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम मध्ये 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन मोठया प्रमाणात केले होते ह्या योग कार्यक्रमात ठाणे विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर ह्यांनी सहभागी होत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.

योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा सुंदर समन्वय साधणारी भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आणि संतुलित आयुष्यासाठी योगाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे असे ह्यावेळी आमदार संजय केळकर ह्यांनी बोलताना सांगितले .

या निमित्ताने उपस्थित सर्व योगप्रेमींसोबत योगसाधना करताना सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा अनुभव मिळाला. आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी, सक्षम आणि आनंदी समाज घडविण्याचा संकल्प करूया.

“दररोज योग, निरोगी जीवनाचा संयोग!”

“योग आहे जीवनाचा आधार, निरोगी भारताचा हा विचार!”

ह्यावेळी आयोजक दत्ता घाडगे ह्यांनी आमदार संजय केळकर ह्यांचे स्वागत सत्कार केले व वेळात वेळ काढून कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिल्या बद्दल आभार मानले तसेच पतंजली योग समिती चे सुद्धा आभार मानले.
ह्यावेळी दत्ता घाडगे ह्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली.सदर कार्यक्रमाला नागरिकांनी ही उत्तम प्रतिसाद देत कार्यक्रमाचे आयोजक दत्ता घाडगे हे गेली अनेक वर्षे हा स्तुत्य उपक्रम राबवितात त्या बद्दल दत्ता घाडगे ह्यांचेही नागरिकांनी ह्यावेळी आभार मानले.

Continue Reading

Previous: तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारची मोठी झेप…
Next: बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×