
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती. सुनेत्रा पवार यांच्या शुभाशीर्वादाने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार मा. श्री. प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर (जिल्हा) तसेच विविध फ्रंटल, सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
ठाणे शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी नगरसेवक इब्राहीम राऊत, माजी नगरसेविका आशरीन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, प्रदेश सचिव हेमंत वाणी, प्रदेश सचिव रमेश इंदिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उर्वरित फ्रंटल, सेल, विभाग तसेच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनाला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.