Skip to content
April 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • एम बी ए फाउंडेशन अव्वल….

एम बी ए फाउंडेशन अव्वल….

S9 TV NEWS February 8, 2026
IMG-20260208-WA0029.jpg
Like, Follow, Subscribe

लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक विद्यमाने आयोजित दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन संस्थेने बाजी मारली.
एन के टी सभागृहात जुन्या संमिश्र गाण्यांवर पार पडलेल्या या नृत्य स्पर्धेत १३ शाळांमधील सुमारे १३० हून अधिक विशेष विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ तरल नागडा यांच्या संकल्पनेतून ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष होते. झवेरी ठाणावला कमलिनी कर्णबधिर स्कूलच्या चमूने दुसरा तर विश्वास सेंटरने तृतीय स्थान संपादन केले. विशेष मुलांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवसोदिवस या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजात या मुलांना स्वीकारण्याची भावना वाढीस लागल्याचे लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष प्रसाद खोपकर यांनी सांगितले. सर्वश्री डॉ जुई मांडके आणि दिप्ती नायर यांनी यावेळी परिक्षक म्हणून काम पाहिले. लायन्स क्लबचे माजी जिल्हा गव्हर्नर राकेश चौमाल, लिओ क्लबच्या जिल्हा गव्हर्नर शिवानी शाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा ग्रीष्मा इंदप यांनी आभार प्रदर्शन केले.

Continue Reading

Previous: ठाणे महापौर उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल…
Next: लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×