Skip to content
March 3, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • गणपत भुवड संघाला विजेतेपद….

गणपत भुवड संघाला विजेतेपद….

S9 TV NEWS December 9, 2025
IMG-20251209-WA0006.jpg
Like, Follow, Subscribe

ध्रुशील हिरे, स्मित पोमेंडकरची अर्धशतकी खेळी आणि आयुष गोहे, तन्मय महासरियाच्या उपयुक्त गोलंदाजीमुळे मिळालेल्या पहिल्या डावातील ४० धावांच्या आघाडीच्या जोरावर गणपत भुवड संघाने सदाशिव सातघरे संघावर वर्चस्व मिळवत ठाणे फ्रेंड्स युनियन आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या दुसऱ्या तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. गणपत भुवड संघाने पहिल्या डावात १९५ धावा उभारत प्रतिस्पर्ध्यांना १५५ धावांवर रोखत संघाचा विजय निश्चित केला होता.
प्रथम फलंदाजी करताना ध्रशीलने ५८, स्मितने ५० आणि यश धाबेने ३० धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली होती. या डावात आयुष सुर्वेने चार,रुद्र गिरीने तीन आणि आदित्य खेडेकरने दोन बळी मिळवले. उत्तरादाखल निरव भोरकरने ४६ आणि फलंदाजीत आपली छाप पाडताना आदित्य खेडेकरने ४३ धावा करत संघाला आश्वासक धावा करून दिल्या होत्या पण इतर फलंदाज ढेपाळल्याने सदाशिव सातघरे संघाला दिड शतकी धावसंख्येवर समाधान मानावे लागले. आयुष गोहे आणि तन्मय महासरियाने प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रद्यान भोसलेने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक : गणपत भुवड संघ – पहिला डाव : ९ बाद १९५ डाव घोषित ( ध्रशील हिरे ५८, स्मित पोमेंडकर ५०, यश धाबे ३०, आयुष सुर्वे १९.५-१-४३-४, रुद्र गिरी १६-३-४०-३, आदित्य खेडेकर १९-७-४०-२) पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी विरुद्ध सदाशिव सातघरे संघ – पहिला डाव सर्वबाद १५५ (निरव भोरकर ४६, आदित्य खेडेकर ४३, आयुष गोहे १६- ३- ४६-३, तन्मय महासरिया १६.५- ८- २०-३, प्रद्यान खेडेकर १२- ०- १५- २).
वैयक्तिक सर्वोत्तम खेळाडू : स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – सार्थ पाटील.
सर्वोत्तम फलंदाज – तन्मय मालुसरे. गोलंदाज – आयुष सुर्वे, यष्टिरक्षक – तन्मय मालुसरे, क्षेत्ररक्षक – निरव भोरकर.

Continue Reading

Previous: दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन मध्ये ५१७३ धावपटूंचा उत्साह!
Next: सिंघानियाच्या विजयात आर्या कनिश चमकले…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×