

भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन व आपतकालचे 50 वे वर्षे या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांतर्गत आज एक पेड मा के नाम अभियान राबविण्यात आले ह्या अभियानाचा शुभारंभ ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून झाला या वृक्ष लागवड उपक्रमात विविध प्रजातीच्या शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी शिवशांती संस्थेचे विनय कुमार सिंग व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.