
महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने केला गौरव,
रुपये पाच हजार कोटींपेक्षा अधिक ठेवींसाठी सन्मानित..
देशात नागरी सहकारी बँकात अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. टीजेएसबी सहकारी बँकेला पाच हजार कोटींच्या पेक्षा अधिक ठेवींच्या श्रेणीसाठी सदर पुरस्कार देण्यात आला आहे. टीजेएसबी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सीए वैभव सिंघवी, व्यवस्थापकीय संचालक-मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर आणि सर-व्यवस्थापक विनायक गोरे यांनी सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य ज्योतिन्द्रभाई मेहता, आमदार प्रवीण दरेकर, फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, उपाध्यक्ष वैशाली आवाडे यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला. सदर पुरस्काराने टीजेएसबी सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची आणखी एक मोहर उमटवली आहे.बँकेच्या तंत्रज्ञानयुक्त ग्राहक केंद्रित एकात्मिक कार्यप्रणालीचे हे यश आहे. या कार्यक्रमाला नागरी सहकारी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.