Skip to content
March 3, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • ठाण्यात रंगणार अस्मिता लीग मैदानी स्पर्धा….

ठाण्यात रंगणार अस्मिता लीग मैदानी स्पर्धा….

S9 TV NEWS November 14, 2025
IMG-20251114-WA0013.jpg
Like, Follow, Subscribe

केंद्र शासनाच्या खेळों इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई ) आणि भारतीय ऍथलेटिक्स महासंघातर्फे १४ आणि १६ वर्ष वयोगटाच्या युवा महिला धावपटुंकरता अस्मिता लीग निवड चाचणी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी मुंब्र्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी राष्ट्ट्रीय पातळीवरून देशातील ३०० जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेला संलग्न असलेल्या विविध संस्था, शाळांमधून सुमारे ६०० हुन अधिक धावपटू सहभागी होतील असा विश्वास ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर यांनी व्यक्त केला. स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींकरता ट्रायथलॉन (ए ) ( ६० मीटर रन, लांब उडी (किमान ५ मीटर), गॊळाफेक (१ किलो बॅकथ्रो), ट्रायथलॉन (बी ) ( ६० मीटर रन, लांब उडी किमान ५ मीटर, गोळाफेक १किलो बॅक थ्रो,) ट्रायथलॉन (सी ) ६० मीटर रन ,, लांब उडी (किमान ५ मीटर), ६०० मीटर रन ) किड्स भालाफेक या क्रीडा प्रकारांची स्पर्धा होईल. १६ वर्षाखालील वयोगटाकरता ६० मीटर रन, ६०० मीटर रन, लांब उडी (किमान५ मीटर), उंच उडी, गोळाफेक (३ किलो), भालाफेक (५०० ग्रॅम)किमान १० मीटर अशा स्पर्धा असतील.
या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने नियुक्त केलेली निवड समिती उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त धावपटूंनी सहभागी व्हावे. अधिक माहितीकरता ९८६९००००४८ असे आवाहन ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेंद्र मयेकर यांनी केले आहे.

Continue Reading

Previous: श्री साईनाथ मंदिराचा 39 वा वर्धापन दिन उत्सव सोहळा….
Next: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार प्रदान….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×