
मेट्रो-४ प्रकल्पामुळे होणार गतिमान ठाणे – गतिमान प्रवास !
प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाना यश !
शहराच्या वेशीवर असलेले ठाणे शहर तसेच शहरालगत असलेल्या मीरा-भाइर्दर शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने भविष्यात वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनाची संख्या वाढल्याने ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीला तोंड द्यावे लागू शकते तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर वाढणारा ताण हे लक्षात घेऊन यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने मी स्थानिक आमदार या नात्याने शहराच्या वेशीवर आलेली मेट्रो कासारवडवली पर्यंत नेण्यात यावी यासाठी तात्कालिन मुख्यमंत्री मा.श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून मागणी केली होती. त्याचबरोबर याकरीता त्यावेळचे शिवसेना पक्षाचे आमदार व आताचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आंदोलने देखील केली.
त्यानंतर सन २०१४ मध्ये मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर तात्कालिन मुख्यमंत्री म्हणून वडाळा ते कासारवडवली असा मेट्रो मार्ग करण्यात यावा जेणेकरून ठाणे शहरातील नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर होईल यासाठी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. याकरिता मी स्थानिक आमदार या नात्याने तात्कालिन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात मेट्रो कंदिलाची प्रतिकृती भेट देऊन तसेच नागपूरसह, पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईत मेट्रोला मंजूरी मिळून काम देखील सुरू झाले होते परंतु ठाणे मेट्रोला का मंजुरी देत नाही यासाठी अधिवेशन काळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून ’मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर तुपाशी ठाणे का उपाशी?“ या घोषणेचे बॅनर झळकवून ठाणे शहरात मेट्रो सुरू करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले होते. अखेर एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ च्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली व कामाला देखील सुरूवात करून डिसेबंर २०२५ पर्यंत या विहीत दिलेल्या वेळेत प्रकल्प पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. अखेर मेट्रो-४ हा प्रकल्प पुर्ण झाला असून दि. २२ सप्टेंबर, २०२५ रोजी मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून गेल्या १५ वर्षांपासूनच्या अथक प्रयत्नाना यश येऊन स्वप्न साकार होत असल्यामुळे मी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणविस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, श्री. अजितदादा पवार यांचे मनपुर्वक आभार मानतो.