
मंगळागौरी हा एक मराठी सण आहे. जो विशेषता श्रावण महिन्यात साजरा केला जातो. हा सण गौरी देवीच्या उपासनेसाठी आणि तिच्या आशीर्वादासाठी समर्पित आहे. श्रावण महिन्याचे औचित्य साधून ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे “खेळ मंगळागौरीचा” या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आणि शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर तसेच माजी नगरसेविका मीनाक्षी राजेंद्र शिंदे या कार्यक्रमाच्या आयोजक असून शिवसेना ठाणे जिल्हा शाखा व समस्त महिला आघाडी यांचाही सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला ठाण्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे या उपस्थित राहणार आहेत. या मंगळागौरी सोहळ्यात फुगडी, झिम्मा बसफुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी असे विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. महिलांसाठी विविध सांस्कृतिक खेळांची मेजवानी असणार आहे.