
सौम्या दळवी हिने ज्युनियर राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला . अहमदाबाद येथे झालेल्या या स्पर्धेत सौम्याने स्नॅच प्रकारात ७६ व क्लीन अँड जर्क प्रकारात १०१ असे एकूण १७७ किलो वजन उचलून नव्या राष्ट्रकुल विक्रमाची नोंद केली. सौम्याची हि कामगीरी वरिष्ठ गटात सुवर्ण पदक विजेती मीराबाई चानू नंतर दुसऱ्या क्रमांकाची ठरली. चानूने या स्पर्धेत एकूण १९६ किलो वजन उचलले होते. सौम्याने यापूर्वी ही छाप पाडताना मागील ज्युनियर गटाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४६ किलो गटात सुर्वणपदक पटकावले होते. सौम्या कल्याणच्या रिक्रेएशन व्यायामशाळेत पश्चिम रेल्वेत तिकीट तपासनीस असलेले वडील सुनील दळवी आणि समीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंग खेळाचा सराव करते.