Skip to content
October 6, 2025
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • एसटीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध….

एसटीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध….

S9 TV NEWS August 2, 2025
IMG-20250802-WA0066.jpg
Like, Follow, Subscribe

एसटी महामंडळ त्यांच्या बसस्थानकांना सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे.महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेस च्या वतीने ठाणे रेल्वे स्थानका जवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी एसटीचे खासगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य ,स्वच्छता गृहांची दुरावस्था, बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, महामंडळांच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले.यावेळी काँग्रेस च्या वतीने सिमेंट मिक्सर वाहन आणून काँक्रीटीकरण करत आगारातील खड्डे बुजविण्यात आले. ठाणे काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आतापर्यंत शहरात कोट्यावधी रुपये काँक्रिटीकरण व डांबरीकरणावर खर्च करण्यात आले परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का..? तसेच एसटी स्थानके भाडेतत्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्याच शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी – सुविधा पुरवू शकत नाही ही खेदाची बाब आहे.

Continue Reading

Previous: खासदार नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार प्रदान….
Next: मंगळागौर स्पर्धेतून रणरागिणींना मानवंदना….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.