Skip to content
March 3, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • सिंघानियाच्या विजयात आर्या कनिश चमकले…

सिंघानियाच्या विजयात आर्या कनिश चमकले…

S9 TV NEWS December 9, 2025
IMG-20251209-WA0007.jpg
Like, Follow, Subscribe

कनिश कदमने अवघ्या तीन मिळवलेले तीन बळी आणि आर्य गजराच्या अर्धशतकी खेळीमुळे सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलने अमुलख आमिचंद इंटरनॅशनल स्कूलचा १९३ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आर्य, अद्वैत कचराज आणि अन्वय शेळकेने संयमी फलंदाजी करत संघाला २१९ धावांचा पल्ला गाठून दिला. आर्यन ५६, अन्वयने ३८ आणि अद्वैतने ३४ धावा केल्या. पर्व चौहान आणि विहान मोपणीने प्रत्येकी चार फलंदाज बाद केले. उत्तरादाखल अमुलख आमिचंद इंटरनॅशनल स्कूलचा डाव फक्त ३६ धावांवर ढेपाळला. कनिशसह आदित्य गोखले आणि अनिश गोपाळेने प्रत्येकी दोन बळी मिळवत संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक : सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल : सर्वबाद २१९ ( आर्य गजरा ५६, अन्वय शेळके ३८, अद्वैत कचराज ३४, पर्व चौहान ६-३८-४, विहान मोपाणी १०-१-३९-४) १९३ धावांनी विजयी विरुद्ध अमुलख आमिचंद इंटरनॅशनल स्कूल : सर्वबाद ३६ (कनिश कदम ०.४-०-३-३, आदित्य गोखले ३-१-१०-२, अनिश गोपाळे ४-०-२४-२).

Continue Reading

Previous: गणपत भुवड संघाला विजेतेपद….
Next: टाईट रायडर्सच्या विजयात सम्राट नाखवा चमकला….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×