Skip to content
March 3, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • श्री आनंद भारतीची हॅट्ट्रिक

श्री आनंद भारतीची हॅट्ट्रिक

S9 TV NEWS November 17, 2025
IMG-20251117-WA0009.jpg
Like, Follow, Subscribe

यजमान श्री आनंद भारती समाजाने आपले वर्चस्व अबाधित राखत चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने आयोजित ठाणे जिल्हा निवड चाचणी मल्लखांब स्पर्धेत सांघिक विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. श्री आनंद भारती समाज संघाने तीन सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकली. स्पर्धेतील १८ वर्षाखालील मुलांच्या गटात तिन्हीही पदके जिंकत एकहाती विजय मिळवला. स्पर्धेत ५४ गुण नोंदवून श्री आनंद भारती समाजाने सलग तिसऱ्यांदा सांघिक विजेतेपदावर आपली मोहोर उमटविली. श्री मा गुरुकुल संघाने ५१ गुण मिळवत सांघिक उपविजेतेपद मिळवले. तर १९ गुणांसह अतुल्य संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. स्पर्धेत सहभागी झालेल्या ११ संघातील १०६ खेळाडूंमधून आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडलेल्या ठाणे जिल्ह्याच्या संघात श्री आनंद भारती समाजाच्या १२ मल्लखांबपटूंची निवड झाली आहे. स्पर्धेचा गटनिहाय निकाल : मुले – १२ वर्षाखालील : श्रीराम जाधव (श्री आनंद भारती समाज, सुवर्ण), निर्विघ्न कोकणे (रौप्य,श्री माँ गुरुकुल), गौरांश शिंदे (कांस्य, एन एच जी एस ए), १४ वर्षाखालील : स्वानंद मोरे (रौप्य, एन एच जी एस ए), हरिधन शिंदे (रौप्य, श्री माँ गुरुकुल), राजवीर साठे (कांस्य, श्री आनंद भारती समाज).१८ वर्षाखालील : स्वराज ठाकरे (सुवर्ण), रुद्र टिकेकर (रौप्य), हेमंत सुतार (कांस्य, सर्व श्री आनंद भारती समाज). १८ वर्षावरील मुले : आर्यन कदम (सुवर्ण, श्री माँ गुरुकुल), प्रतिश तरे (श्री आनंद भारती समाज).रमेश वझे (कांस्य, अतुल्य संघ).
मुली – १२वर्षाखालील : धृती कोतीन ( सुवर्ण, श्री माँ गुरुकुल), दिशा पुंजरी (रौप्य, अतुल्य संघ), जुई कणसे (कांस्य, श्री अंबिका मल्लखांब), १४ वर्षाखालील : शौर्या साळवे (सुवर्ण, श्री आनंद भारती समाज), प्राची सावंत ( रौप्य, श्री माँ गुरुकुल), विदुल पाटील (कांस्य, श्री आनंद भारती समाज).१६ वर्षाखालील : अनुष्का चित्रे ( सुवर्ण, गजानन विद्यालय), अस्मि खरात ( रौप्य, श्री माँ गुरुकुल), काव्या नाईक (कांस्य, एन एच जी एस ए). १६ वर्षांवरील : जीविका मौर्य (सुवर्ण), कृष्णेषा चव्हाण (कांस्य)सर्व श्री माँ गुरुकुल.

Continue Reading

Previous: ठाण्यात प्राण्यांसाठी स्मशानभूमी….
Next: तुकाराम सुर्वे स्मृती क्रिकेट स्पर्धा शनिवारपासून रंगणार….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×