Skip to content
February 4, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शिवसेना गटनेतेपदी पवन कदम..

शिवसेना गटनेतेपदी पवन कदम..

S9 TV NEWS January 22, 2026
IMG-20260122-WA0006.jpg
Like, Follow, Subscribe

ठाणे महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या ७५ नगरसेवकांनी बुधवारी गट स्थापन केला असून पवन कदम यांच्याकडे गट नेतेपदाची जबाबदारी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. तर एकमेव अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी या मात्र स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे समजते. महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना पक्षाला ७५ जागी यश मिळाले होते. या सर्व जणांचा गट करण्याची प्रक्रिया कोकण भवन येथे केली जात असून गट झाल्यानंतर ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.  त्याचा त्याचा व्हीप नगरसेवकाला बंधनकारक असतो. पुढील महिन्यात ठाणे महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, त्याचबरोबर विशेष समिती सभापती यांची निवडणूक होणार आहे त्याकरिता गट स्थापन करणे आवश्यक असते. त्यामुळे बुधवारी ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला असून प्रभाग क्र. २२ मधून विजयी झालेले पवन काशिनाथ कदम यांची गट नेते पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सहीने पक्षाचे व्हीप काढले जाणार आहेत दरम्यान कळवा येथिल प्रभाग  २३ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रमिला केणी यांनी मात्र स्वतंत्र गट निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

Continue Reading

Previous: भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यात जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न…
Next: महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×