Skip to content
March 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • राजकीय
  • शिंदे एकवचनी – हणमंत जगदाळे

शिंदे एकवचनी – हणमंत जगदाळे

S9 TV NEWS December 30, 2025
IMG-20251230-WA0017.jpg
Like, Follow, Subscribe

एकनाथ शिंदे यांनी हणमंत जगदाळे यांना दिलेला शब्द पाळला

हणमंत जगदाळे यांच्यासह चार जणांना शिवसेनेची उमेदवारी

गत निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो. लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगरचा विकास करण्याचे वचन तत्कालिन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. आज आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करुन एकनाथ शिंदे हे एक वचनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हणमंत जगदाळे यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षाने आज ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ६ मधून हणमंत जगदाळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत (राजा) जाधवर, सौ. सरिता दिगंबर ठाकूर, सौ. वनिता संदीप घोगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हणमंत जगदाळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली. अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असतांना सत्ते अभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती. यामुळे मी आणि माझ्या तिनही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. कल्टरच्या माध्यामातून लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगर रहिवाशांना हक्काचे आणि प्रशस्त घर देण्याचे माझे स्वप्न आहे. विरोधी पक्षनेता असतांना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन मी क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो. त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना फुटला आहे. लवकरच एक वर्षांच्या आत पुनर्विकासाचे काम सुरु होईल, अशी ग्वाही हणमंत जगदाळे यांनी दिली आहे.

Continue Reading

Previous: भिवंडीला ठाणे मुंबईसारख्या सुविधा देणार…
Next: प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी उपक्रमासाठी पितांबरीचा पुढाकार!
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×