Skip to content
February 4, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रोटरी तर्फे रायला(Ryla)उपक्रम

रोटरी तर्फे रायला(Ryla)उपक्रम

S9 TV NEWS January 29, 2026
IMG-20260129-WA0010.jpg
Like, Follow, Subscribe

रोटरी ठाणे टायटन्स तर्फे कर्जत येथील शासकीय आश्रम शाळेत दोनदिवसीय ‘रायला (RYLA)’ उपक्रम 

रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्स यांनी रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे टायटन्स तसेच इनर व्हील क्लब ऑफ उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरपाडा–पात्रज, कर्जत येथील शासकीय आश्रम शाळेत दिनांक २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी ‘रायला (Rotary Youth Leadership Awards – RYLA)’ उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला.
सदर शाळेच्या वसतिगृहात ७ ते १५ वर्षे वयोगटातील १०० मुली व ७ ते १५ वर्षे वयोगटातील २० मुले वास्तव्यास असून त्यांना शिक्षणासोबत सुरक्षित व संरक्षित निवासी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
या प्रसंगी रोटरीच्या सदस्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. कार्यक्रमाला क्लब अध्यक्ष रोटेरियन योगेश नंदकुमार फुटाणे यांच्या नेतृत्वाखालील रोटरी पथक उपस्थित होते. तसेच क्लब मेंटॉर डॉ. सीए विजय नारायण केवलरामाणि, माजी अध्यक्ष नंदकुमार फुटाणे व संदीप धोत्रे, तसेच क्लब सदस्य ॲड. सौरभ विजय केवलरामाणि यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास मार्गदर्शन केले. रोटरॅक्ट पथकाचे नेतृत्व अध्यक्ष निलेश नाईडू यांनी केले. त्यांच्या सोबत देव व साक्षी हे रोटरॅक्ट सदस्यही सहभागी होते. इनर व्हील क्लब ऑफ उल्हासनगरच्या अध्यक्षा डॉ. गायत्री विजय केवलरामाणि यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. याशिवाय रंगकर्मी/थिएटर आर्टिस्ट आरती मोरे यांनी विशेष सत्र सादर करून कार्यक्रमाला प्रभावी दिशा दिली.
या उपक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजित लाळासाहेब भनसोडे उपस्थित होते. त्यांच्या सोबत इतर शिक्षकवर्ग, तसेच वसतिगृह व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे मुलींच्या वॉर्डन श्रीमती. सविता पुंडलिक पखाले आणि मुलांच्या वॉर्डन श्री. राजेंद्र माने हेही उपस्थित होते.
या दोन दिवसांच्या उपक्रमात रोटरी–रोटरॅक्ट–इनर व्हीलच्या टीमने विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. उपस्थित सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन केले, चॉकलेट्स वाटप केले, आवश्यक औषधांचा संच शाळेस सुपूर्द केला आणि विद्यार्थ्यांसोबत खेळ व मनोरंजनात्मक उपक्रम राबवून आनंदी वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून सामाजिक जाणीव निर्माण करणारे सत्रही आयोजित करण्यात आले. आरती मोरे यांनी बालविवाहाच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बाल लैंगिक शोषण,छेडछाडीबाबत जागृती निर्माण करणारे एकपात्री नाट्यप्रयोग (one-person skit) सादर करून मुलांमध्ये सुरक्षितता, आत्मविश्वास आणि ‘बोलणे महत्त्वाचे’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. अजित लाळासाहेब भनसोडे यांनी रोटरी–रोटरॅक्ट–इनर व्हील टीमचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, ही टीम दरवर्षी शाळेसाठी आवश्यक औषधे पुरवते, शाळेच्या मैदानावर मुलांसोबत खेळ खेळून त्यांचे मनोरंजन करते, विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधून नाते जोडते तसेच महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने/चर्चा घेऊन मुलांना जागृत करते. अशा प्रकारचा पाठिंबा पुढील वर्षांमध्येही सातत्याने मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमातून ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सामाजिक जागृती आणि आरोग्य-सुरक्षा विषयक जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने रोटरी–रोटरॅक्ट–इनर व्हीलची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली.
शाळा प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Continue Reading

Previous: एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग…
Next: शालेय विद्यार्थ्यांसाठी १ लाख वह्यांचे वाटप…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×