Skip to content
March 24, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाण्यात ‘भोजपुरी लोकसंगीत नाईट’ने रंगला चैत्र नवरात्रोत्सव; उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा गौरव

ठाण्यात ‘भोजपुरी लोकसंगीत नाईट’ने रंगला चैत्र नवरात्रोत्सव; उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा गौरव

S9 TV NEWS March 23, 2026
Like, Follow, Subscribe

ठाणे (प्रतिनिधी): आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित ‘चैत्र नवरात्रोत्सव २०२६: भक्ती व कला महोत्सवात’ उत्तर भारतीय संस्कृती आणि कर्तृत्वाचा संगम पाहायला मिळाला. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित ‘भोजपुरी लोकसंगीत नाईट’ने ठाण्यातील उत्तर भारतीयांना मंत्रमुग्ध केलेच, पण त्याचबरोबर उत्तर भारतीय समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करून त्यांच्या ऋणांची जाणीवही व्यक्त करण्यात आली.

लोकसंगीताची सुश्राव्य मेजवानी
या सांगीतिक संध्याकाळी सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडेय आणि लोकगायिका ममता उपाध्याय यांनी भोजपुरी लोकगीतांचे सादरीकरण केले. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरातून मोठ्या संख्येने उत्तर भारतीय व संगीतप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

मान्यवरांचा गौरव
केवळ सांस्कृतिक मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत उत्तर भारतीय समाजात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. सत्कारार्थींमध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:
डॉ. कमलेश उपाध्याय हरिपुरी, सौ. रेवती नागेंद्र सिंग (नाईक), श्री. अखिलेश कुमार मिश्रा, श्री. रामकिसन जैसवार, श्री. नारायण तिवारी, श्री. धर्मेंद्र मणी तिवारी, डॉ. रोहित कुमार दुबे, डॉ. चंद्रनाथ राहुल तिवारी, श्री. अनिल कुमार पाठक
या सर्व मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांचे सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान केले

मान्यवरांची उपस्थिती
शिवसेना नेते, सचिव,खासदार अनिल देसाई या चैत्र नवरात्र उत्सव ला भेट देऊन देवीचे दर्शन घेऊन आरती केली तसेच त्यावेळी मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शिवसेना महिला आघाडी नीलम धवन, सुप्रिया घोसाळकर त्याचबरोबर इतर मान्यवरांची उपस्थिती लाभले,

विशेष टीप
हिंदी-मराठी गीतांचा ‘सुवर्ण संगम’
उत्सवाचा उत्साह कायम राखत आज, रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता किरण वेहेले प्रस्तुत हिंदी व मराठी लोकप्रिय गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्थळ: श्री. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका, ठाणे.
वेळ: सायंकाळी ७:०० वा.
या कार्यक्रमाला सर्व पत्रकार, छायाचित्रकार यांनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती.

Continue Reading

Previous: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा…
Next: धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्रौत्सवात ‘स्वराज्याचे आख्यान’ मधून पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाची अनुभूती
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×