
समाजसेवेचा आणि आदर्श प्रशासनाचा दीपस्तंभ असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज, दि. ३१ मे, २०२५ रोजी जिल्हा परिषद, ठाणे येथे साजरी करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किर्ती डोईजोडे, जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केलेली जनहितकारी कामे आणि त्यांच्या सुसंस्कृत व न्यायप्रिय प्रशासनाची आठवण करत सर्वांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.