
नियोलिवचा खोपोलीत सर्वात मोठा जमीन व्यवहार
सुमारे १७.५ एकर जागेत वसवणार जागतिक दर्जाचे निवासी संकुल….
निसर्गाच्या सान्निध्यात, सुरक्षित आणि स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा निवासी संकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वसामान्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. भारतातील आघाडीचे विकासक नियोलिवने मार्को प्लॉटेड विकासांतर्गत खोपोली येथे सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार करताना सुमारे १५० कोटी रुपयांत १७.५ एकर जागा खरेदी केली आहे. या व्यवहारासंदर्भात नियोलिवचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा म्हणाले, बहुप्रतीक्षित मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात हिरवळीने व्यापलेल्या जागेत जागतिक दर्जाचे निवासी संकुलाचा प्रकल्प विकसित करण्यासाठी नियोलिवने हा महत्वपूर्ण व्यवहार केला आहे. सेबीची मान्यता असेलल्या वित्त पुरवठा करणाऱ्या युएचएनआय आस्थापनाचा सहभाग असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून इतर निवासी संकुल विकासकांसाठी आदर्शवत असा हा प्रकल्प असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , मुंबई ट्रान्स हरबर लिंकपासून गाडीने तासभराच्या अंतरावर असलेल्या या प्रकल्पात १५० कोटी रुपये खर्चून ०.३६ मिलेनियम वर्ग फुटाचे क्षेत्र विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या निवासी संकुलात प्रीमियम निवासी गाळे आणि विला उपलब्ध असतील. नियोलिव या निवासी संकुलाची उभारणी करणाऱ्या कंपनीची स्थापना मोहित मल्होत्रा यांनी भारतातील अग्रणी वेल्थ फर्म ३६० वन या संस्थेच्या सहर्कायाने केली आहे. नियोलिवने आतापर्यंत १०० हुन अधिक निवासी प्रकल्प विकसित केले आहेत.