Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कला चित्राचे उद्घाटन…

कला चित्राचे उद्घाटन…

S9 TV NEWS March 11, 2026
IMG-20260310-WA0012.jpg
Like, Follow, Subscribe

न्यायमुर्ती अभय ओक यांच्या हस्ते संविधानातील कला चित्राचे उद्धाटन

विद्या प्रसारक मंडळाचे टीएमसी विधी महाविद्यालय, ठाणे येथे संविधानातील मुळ प्रतीतील चित्राचे कायमस्वरुपी प्रदर्शनाचे उद्धाटन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. अभय ओक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, सचिव श्री अभय मराठे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रीविद्या जयकुमार, उपप्राचार्य डॉ. विनोद एच वाघ उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती अभय ओक यांनी आनंद व्यक्त करतांना, असे कायमस्वरूपी प्रदर्शन आयोजित करणारे टीएमसी विधी महाविद्यालय कदाचित भारतातीत पहिलेच असेल अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी, वकीलांनी व नागरिकांनी या चित्राच्या माध्यमातून आपला इतिहास समजून घेतला पाहीजे, तसेच यावर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता दर्शवली. या निमित्ताने विधीचे विद्यार्थी संविधानाला अधिक प्रखरतेने व गंभीरतेने समजून घेतील अशी भावना व्यक्त केली. डॉ. श्रीविद्या जयकुमार यांनी, असे प्रदर्शन भरविण्यामागचा महाविद्यालयाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर न्यायमूर्ती अभय ओक यांनी भारतातील फौजदारी खटल्याची प्रक्रिया यावर व्याखान दिले. न्यायमूर्ती ओक यांनी सांगितले की, भारतातील फौजदारी कायदे मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित आहेत. त्यामुळे दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीलाही न्याय्य खटल्याचा अधिकार दिला जातो. त्यांनी भारतातील फौजदारी न्यायव्यवस्थेच्या विकासाची प्रक्रिया स्पष्ट करताना ज्यूरी ट्रायल पद्धतीपासून आजच्या विद्यमान न्यायप्रक्रियेपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. त्यांच्या मते, भारतीय फौजदारी कायदा संतुलित दृष्टिकोन राखतो आणि गुन्हेगारी खटल्यामध्ये अभियोक्ता आणि आरोपी या दोन्ही पक्षांना समान व न्याय्य संधी उपलब्ध करून देतो. न्यायमूर्ती ओक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांना फौजदारी न्यायप्रणालीच्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग शस्त्रक्रियांची घोषणा….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×