Skip to content
February 4, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • Uncategorized
  • ठाणे महापौर उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल…

ठाणे महापौर उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल…

S9 TV NEWS January 30, 2026
IMG-20260130-WA0047.jpg
Like, Follow, Subscribe

ठाणे महापौर उपमहापौर पदासाठी आज नामनिर्देशन अर्ज दाखल

ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून एक तर उपमहापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिका सचिव मनीष जोशी यांनी दिली. शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी, तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आज (३०जानेवारी २०२६) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह पक्षाचे गटनेते, नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. महापौर व उपमहापौर पदांसाठीची ‍निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ सकाळी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित राहणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे.

Continue Reading

Previous: शालेय विद्यार्थ्यांसाठी १ लाख वह्यांचे वाटप…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×