महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १ लाख वह्यांचे वाटप
युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक राबवणार उपक्रम
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या तर्फे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सदर उपक्रम ३१ जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान राबवण्यात येत आहेत.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेबांची समाजकारणाची शिकवण मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे पुढे नेत आहेत. वाढदिवस म्हणजे आनंद साजरा करणे नव्हे तर जनसेवेची ही अनोखी संधी आहे. जनसेवेतून या दिवशी माय बाप जनतेच्या मिळणाऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद अधिक लाखमोलाचे आहेत. म्हणून युवासेनेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. ही शैक्षणिक मदत लाखो मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान आणेल, असे पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले.
दि. ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान शिवसेना शाखा क्र. १० लोकमान्य नगर पाडा नं.४, शिवसेना मध्यवर्ती शाखा पाडा नं. २ लोकमान्य नगर, शिवसेना शाखा वर्तक नगर, शिवसेना शाखा भिम नगर, शिवसेना शाखा शिवाईनगर, शिवसेना शाखा कोंकणी पाडा, शिवसेना शाखा वसंत विहार आदी ठिकाणी तर १ फेब्रुवारी रोजी शिवसेना शाखा नळपाडा, शिवसेना शाखा गांधीनगर, शिवसेना शाखा माजिवडा गाव, श्री हनुमान मंदिर वाघबीळ, सरस्वती शिवसेना शाखा आनंदनगर, श्री हनुमान मंदिर, ओवळा या ठिकाणी वह्या वाटप करण्यात येईल.
000