विजय घासून-पुसून नाहीतर ठासूनच, धनुष्यबाण दाबा—विरोधकांना पाणी पाजा!
अकोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनाभेला उसळला लाडक्या बहिण-भावांचा भगवा जनसागर
अकोल्याच्या राजकारणात आज निर्णायक वळण लागल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत लाडक्या बहिणी-भावांनी प्रचंड गर्दी करत अक्षरशः जनसागर उसळवला. “ही केवळ सभा नाही, तर परिवर्तनाची नांदी आहे. 15 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा,” असे थेट आवाहन करत शिंदेंनी रणशिंग फुंकले.
“अकोल्यात घासून-पुसून नव्हे, ठासून विजय मिळवायचा आहे,” असा इशारा देत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “वर्षानुवर्षे सत्तेत राहूनही जनतेला पाणी देऊ शकले नाहीत. आता महापालिका निवडणुकीत त्यांनाच पाणी पाजा,” असा घणाघात त्यांनी केला.
मोरणा नदी पूर संरक्षण भिंत, भुयारी गटार, पाणीपुरवठा योजना, रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, मैदानं, शाळा-हॉस्पिटल्स हा विकासाचा अजेंडा असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
सभेत लाडक्या बहिणींची प्रचंड उपस्थिती ठळक होती.

“ज्या उमेदवारांच्या मागे महिलांची ताकद उभी असते, त्यांचाच विजय होतो,” असे सांगत शिंदेंनी लाडकी बहीण योजनेची पुनःघोषणा केली. “कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द,” असे ठाम आश्वासन देताना त्यांनी महिलांना ‘लखपती’ बनवण्याचा संकल्प जाहीर केला.
महिलाना एसटीत 50% सवलत, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, युवक प्रशिक्षण योजना, शेतकरी सन्मान या योजनांचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. “काही लोकांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलेला आहे.” नगरपरिषद निवडणुकीत विरोधक गायब होते, मतदारांनी त्यांना गायब करून टाकले, असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला. त्यांनी धनुष्यबाण हेच शिवसेनेचे खरे चिन्ह असल्याचे अधोरेखित केले.
“कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे मालक-नोकर नाहीत. जो काम करतो, तोच पुढे येतो,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद दिली.
अकोल्याच्या वाढीव क्षेत्रासाठी (128 किमी) सर्व मूलभूत सुविधा देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदभरती पूर्ण करणार, नाट्यगृह पुन्हा सुरू करणार, प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना कायम मालकी हक्क देणार, अशा ठोस घोषणांनी सभा दणाणली.
सभेच्या शेवटी “15 तारखेला विकासाचा फैसला करा; 16 तारखेला विजयाचा गुलाल उधळूया,” असे आवाहन करत शिंदेंनी अकोल्याचे भविष्य लाडक्या बहिणी-भावांच्या हातात असल्याचे ठासून सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार गोपीकिशन बाजोरिया विप्लव बिजोरिया, युवासेना सचिव विठ्ठल सरप पाटील
यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.