विकास तळागाळापर्यत पोहचवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही – आ. संजय केळकर
विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेने साथ दिली, तशीच साथ ठाणेकर महापालिका निवडणुकीतही महायुतीला देतील. असा विश्वास व्यक्त करून भाजपचे ज्येष्ठ आ. संजय केळकर यांनी डबल इंजिन सरकारचा विकास तळागाळापर्यत पोहचवायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नसल्याचे नमुद केले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रसार माध्यमांसाठी सोईचे ठरावे, यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भाजपच्या मिडिया सेंटरचे उद्घाटन शुक्रवारी आ. संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयातील ह्या मिडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे निवडणुक प्रभारी आ. निरंजन डावखरे, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ते सागर भदे, सुजय पत्की आणि मनाली गायकवाड आदीसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी, ठाणे महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात प्रास्तविक करून ठाण्यातील ४० पैकी ३२ जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. तर, आ. केळकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे महाराष्ट्रभर सुरू असुन ही न थांबणारी कामे आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने विधानसभा तसेच नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या आसपास देखील कुठला पक्ष नाही. तेव्हा, डबल इंजिन सरकारचा हा विकास जर तळागाळापर्यंत पोहचवायचा असेल तर भाजपला पर्याय नसल्याचे नमुद केले. प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांना संबोधित करताना, ह्या महापालिका निवडणुकीच्या मिनी विधानसभेच्या निमित्ताने विचारहीन, दिशाहीन असलेल्या महाविकास आघाडीचे विसर्जन होईल. असे भाकित केले. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. तेव्हा,२९ महापालिकांचे निकाल जेव्हा लागतील तेव्हाही, भाजपच नंबर एकला राहील. कारण विरोधकांकडे कुठलेही मुद्देच नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरांचा विकास होत आहे, त्यामुळे आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहोत. असे नमुद करून पत्रकारांनी निवडणुकी दरम्यान ह्या अद्ययावत मिडीया सेंटरचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेने साथ दिली, तशीच साथ ठाणेकर महापालिका निवडणुकीतही महायुतीला देतील. असा विश्वास व्यक्त करून भाजपचे ज्येष्ठ आ. संजय केळकर यांनी डबल इंजिन सरकारचा विकास तळागाळापर्यत पोहचवायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नसल्याचे नमुद केले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रसार माध्यमांसाठी सोईचे ठरावे, यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भाजपच्या मिडिया सेंटरचे उद्घाटन आज (शुक्रवारी) आ. संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयातील ह्या मिडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे निवडणुक प्रभारी आ. निरंजन डावखरे, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ते सागर भदे, सुजय पत्की आणि मनाली गायकवाड आदीसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी, ठाणे महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात प्रास्तविक करून ठाण्यातील ४० पैकी ३२ जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. तर, आ. केळकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे महाराष्ट्रभर सुरू असुन ही न थांबणारी कामे आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने विधानसभा तसेच नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या आसपास देखील कुठला पक्ष नाही. तेव्हा, डबल इंजिन सरकारचा हा विकास जर तळागाळापर्यंत पोहचवायचा असेल तर भाजपला पर्याय नसल्याचे नमुद केले. प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांना संबोधित करताना, ह्या महापालिका निवडणुकीच्या मिनी विधानसभेच्या निमित्ताने विचारहीन, दिशाहीन असलेल्या महाविकास आघाडीचे विसर्जन होईल. असे भाकित केले. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. तेव्हा,२९ महापालिकांचे निकाल जेव्हा लागतील तेव्हाही, भाजपच नंबर एकला राहील. कारण विरोधकांकडे कुठलेही मुद्देच नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरांचा विकास होत आहे, त्यामुळे आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहोत. असे नमुद करून पत्रकारांनी निवडणुकी दरम्यान ह्या अद्ययावत मिडीया सेंटरचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
- प्रसारमाध्यमांसाठी सुसज्ज मिडिया सेंटर ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस (ता.१६ जाने. पर्यंत) एकाच ठिकाणी सर्व घडामोडी पत्रकारांना सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात. यासाठी भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयात इंटरनेटसह सर्व सोईने सुसज्ज असे मिडिया सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पत्रकार परिषदा तसेच नेते मंडळीच्या मुलाखती पत्रकारांना घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.