Skip to content
March 4, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • केतन म्हात्रेला आनंद श्री किताब

केतन म्हात्रेला आनंद श्री किताब

S9 TV NEWS November 3, 2025
IMG-20251103-WA0010.jpg
Like, Follow, Subscribe

सुपर टॉल गटातील कळव्याच्या अपोलो जीमच्या केतन म्हात्रेने ७२ स्पर्धकांमध्ये वर्चस्व गाजवत ४३ व्या आनंद श्री किताब गवसणी घातली. श्री आनंद भारती व्यायामशाळेच्या वतीने या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रंगतदार ठरलेल्या स्पर्धेत माणकोली येथील अपोलो फिटनेसचा संदेश चव्हाण स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक ठरला . अपोलो फिटनेसने २३ गुणांची नोंद करत सांघिक विजेतेपद मिळवले. तर डोंबिवलीचा बॉडी फिटनेस क्लब १६ गुणांसह उपविजेता ठरला. ‘किताब विजेता केतन म्हात्रेने यशाबद्दल बोलताना हा ‘किताब आपल्या आईला अर्पण केला. गतवर्षी या स्पर्धेत याच गटात दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. या स्पर्धेचे औचित्य साधून माजी आनंद श्री ‘किताब विजेते, दोनदा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, शहापूर येथील श्री आदर्श मंडळाचे जेष्ठ व्यायामप्रशिक्षक रामचंद्र भोईर याना दुसरा रमेश रामजी चव्हाण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमित नांदगावकर यांनी स्पर्धेचे रितसर उदघाटन केले.. श्री आनंद भरती समाजाचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश धिरोलिया ,संदेश धर्माधिकारी यांच्या उपस्थित विजेत्यांना गौरवण्यात आले. सर्वश्री विनायक केतकर, संतोष मलबारी , प्रल्हाद नाखवा यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. विवेक मोरेकर यांनी आभार मानले.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल; गट १ला शॉर्ट – मुद्दीसीर आजसरी ( युनिव्हर्सल फिजिक सेंटर), प्रफुल्ल मर्गज (प्लॅनेट फिटनेस), सुरेंद्र डांगबल (अपोलो फिटनेस). गट २ रा मिडीयम – हर्ष धनावारे (श्री मावळी मंडळ ), सुनील दळवी (प्लॅनेट फिटनेस), जयेश कदम (अँप फिटनेस स्टुडिओ ). गट ३रा टॉल – हिफाजूर रहेमान (युनिव्हर्सल फिजिक सेंटर) ,शिवम सुर्वे (अपोलो फिटनेस), किरण साळवी (साईज्योत फिटनेस). गट ४ था सुपर टॉल – केतन म्हात्रे (अपोलो जिम), शादाब शेख (प्लॅनेट फिटनेस), ऋषिकेश समगिरी (अँप फिटनेस सेंटर).

Continue Reading

Previous: पंढरपुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर थेट प्रहार…
Next: गोपीकृष्ण महोत्सवाला ठाणेकरांची भरभरून दाद…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×