Skip to content
January 18, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • मनोरंजन
  • गोपीकृष्ण महोत्सवाला ठाणेकरांची भरभरून दाद…

गोपीकृष्ण महोत्सवाला ठाणेकरांची भरभरून दाद…

S9 TV NEWS November 4, 2025
IMG-20251103-WA0041.jpg
Like, Follow, Subscribe

ठाण्यातील श्री गणेश कल्चर अकॅडमीच्या पद्मश्री नटराज गोपीकृष्ण महोत्सव गडकरी रंगायतन ठाणे येथे रसिकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात संपन्न झाला. गायन वादन कथकच्या संगमाचे ३१ वे पुष्प होते. या कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के,आमदार संजय केळकर पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पूजा पंत यांच्या बहारदार कथक प्रस्तुतीने झाली.त्यांनी एक वंदना, धमाल ताल पेश केला व त्यातील भावांग सादर केले त्यांना रोहित देव यांनी सुरेख तबला साथ करता करता काही पढंत आयत्यावेळी पेश करून रसिकांची वाहवा मिळवली. दुसरं सत्रात ज्येष्ठ संतूर वादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूर वादन व साउथ इंडियन विद्वान डॉ मैसूर मंजुनाथ यांनी आपल्या जुगलबंदीतून रसिकांना अनोखी मेजवानी दिली. त्यांनी राग किरवाणी सादर करून आलाप मध्य तीन ताल व द्रुत तीनताल अशा दोन रचना व त्यात आवर्तन सादर केले. त्यांना पं मुकुंदराज देव (तबला),पी दक्षिणमूर्ती ( मृदंगम),आदी कलाकारांनी ताल लयीचा संवाद आवर्तनामध्ये पेश केला त्यानंतर झाला सादरीकरणात जुगलबंदी सादर केली. संपूर्ण मैफिलीत किरवानी राग सादर करत असताना विभिन्न शैलीतील वाद्य त्यात संतूर उत्तर हिंदुस्तानी तसेच वायोलिन दक्षिण हिंदुस्तानी असा उत्तम संवादाची अनुभूतीची अनोखी पर्वणी रसिकांना मिळाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात सकाळच्या प्रसन्न वातावरणात गौरव सौरव मिश्रा यांच्या कथक प्रस्तुतीकरणाने झाली.त्यांनी सुरुवातीला शिववंदना त्यानंतर तीनताल पेश केला त्यात उपज आणि सितारा देवी रचित आनंद तांडव नृत्य, चक्रधर पेश करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना यशवंत वैष्णव ( तबला ), फारुख लतिफ खान ( सारंगी ), विवेक मिश्रा ( तबला आणि पढंत ),सोमनाथ मिश्रा ( संवादिनी व गायन)इ नी सुरेख साथ करून रंगमंच सजवला. दुसऱ्या सत्रात बासरी वादक पं रोणु मुजुमदार आणि हृषिकेश मुजुमदार यांनी राग परमेश्वरी मध्ये सुरुवातीला अतिशय शांतपणे केलेला रागविस्तार, ताल धमार मध्ये आलाप जोड गत सादर करत असताना अतिशय हळुवारपणे वाजवलेला खर्ज सूर आणि मधुर बासरीचे सूर व त्याला साजेसा धमार तालाचा बाज त्यातून निघणारी लयकारी इत्यादी वैशिष्ट्ये मांडून रसिकांची दाद मिळवली.त्यानंतर द्रुत तीन ताल मध्ये मातेश्वरी परमेश्वरी ही बंदिश एकीकडे गाऊन आणि वाजवून थोडं गायकी अंग दाखवून राग परमेश्वरीचा माहोल तयार केला. त्यानंतर पहाडी धून सादर केली.त्यांना तालमणी पंडित मुकुंदराज देव यांनी अप्रतिम तबला साथ करून मैफिल उत्तरोत्तर रंगवली. तिसऱ्या सत्राची सांगता डॉ विदुषी पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी सुरुवातीला राग अलैया बिलावल मध्ये ” दैया कहा” ही विलंबित मधील पारंपारिक बंदिश सादर करत असताना रागविस्तारासोबत केलेली संथ आलापी बोल आलाप ताना अतिशय सुरेख मांडून संपूर्ण अलैया बिलावल रागाचे दर्शन भावपूर्ण विषद केले. त्यानंतर पं.शंकर अभ्यंकर यांनी रचलेला मध्यलय आद्धा तीन ताल मधील तराना जोरदार मांडून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर राग जौनपुरीमधील सावन की झरलागी ही पंचम सवारी तालांमधील बंदिश व द्रुत झुलत हिंडोला ही बंदिश ताकतीने पेश करून रागातील सौंदर्य स्थान टिकवून ठेवणं किती महत्त्वाचे आहे आणि गाण्याबरोबर तालाचे वजन सांभाळणे किती महत्त्वाचे असते याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या सादरीकरणातून दाखवून टाळ्यांची दाद मिळवली.त्यांना विश्वनाथ शिरोडकर ( तबला ) सीमा शिरोडकर ( संवादिनी ) यांनी अश्विनी यांच्या सादरीकरणाला धरून उत्तम साथ संगत केली. तानपुरा साथ निमिष कैकाडी आणि कौशिक हाजी यांनी केली. कार्यक्रमाची सांगता भैरवीने केली.

Continue Reading

Previous: केतन म्हात्रेला आनंद श्री किताब
Next: रमेश चव्हाण सर मला गुरुस्थानी – रामचंद्र भोईर
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×