Skip to content
March 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भिवंडीला ठाणे मुंबईसारख्या सुविधा देणार…

भिवंडीला ठाणे मुंबईसारख्या सुविधा देणार…

S9 TV NEWS December 22, 2025
IMG-20251222-WA0070.jpg
Like, Follow, Subscribe

भिवंडी चा विकास करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही

भिवंडीला ठाणे-मुंबईसारख्या सुविधा देणार; पण बुलडोझरचे राजकारण करणार नाही

माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसारख्या शहरांप्रमाणे भिवंडीला आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, विकासाच्या नावाखाली कोणावरही अन्याय होणार नाही, कुणावरही बुलडोझर चालवला जाणार नाही आणि सर्वांना विश्वासात घेऊनच पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भिवंडी येथे शिवसेनेचे नेते रुपेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. भिवंडी शहरात शिवसेनेचे नेते रुपेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार रुपेश म्हात्रे, आमदार शांताराम मोरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांचे कौतुक केले. राज्यभरात ६२ नगराध्यक्ष तसेच हजारो नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले असून, हे यश तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रुपेश म्हात्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असून, समाजकारणाला प्राधान्य देत सातत्याने काम करत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र घेऊन, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन रुपेश म्हात्रे पुढे जात आहेत,” असे ते म्हणाले. भिवंडीच्या विकासाबाबत बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, शहराचा विकास करताना ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदरसारख्या शहरांप्रमाणे आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, विकासाच्या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही, कुणालाही जबरदस्तीने विस्थापित केले जाणार नाही आणि सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच योग्य पुनर्वसन केले जाईल. तसेच, “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी सर्वसामान्य कुटुंबांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. यावेळी रुपेश म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानत, या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचा शब्द दिला.

Continue Reading

Previous: आशा सेविकांचा सन्मान
Next: शिंदे एकवचनी – हणमंत जगदाळे
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×