Skip to content
July 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अजितदादा पवार यांच्या आवडीच्या गीतांमधूनठाण्यात २२ जुलै रोजी आदरांजली कार्यक्रम…

अजितदादा पवार यांच्या आवडीच्या गीतांमधूनठाण्यात २२ जुलै रोजी आदरांजली कार्यक्रम…

S9 TV NEWS July 16, 2026
Like, Follow, Subscribe

वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे आयोजन, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून, त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात २२ जुलै रोजी गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील.

वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती.
दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीने आदंराजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, असे नमूद करीत प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते. अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान आणि त्यांना सामान्यांविषयी आत्मियतेचा धागा होता. त्याचबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती. त्याअनुषंगाने वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहील. त्याचबरोबर या कार्यक्रमात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोध डावखरे यांनी केले. त्याचबरोबर यापुढील काळात ठाण्यातील नागरिकांसाठी दरमहा विविध उपक्रमांबरोबरच कार्यक्रम सादर करण्यात येतील, असे प्रबोध डावखरे यांनी सांगितले.

Continue Reading

Previous: कच्छी समाजाशी जिव्हाळ्याचे नाते कायम…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×