Skip to content
July 11, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आझादनगर येथील दुर्घटनाग्रस्त भागाची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली पाहणी…

आझादनगर येथील दुर्घटनाग्रस्त भागाची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली पाहणी…

S9 TV NEWS July 10, 2026
Like, Follow, Subscribe

आजूबाजूच्या नागरिकांचे तात्काळ स्थलांतर व जखमींचा खर्च करण्याचे महापालिकेस निर्देश

ठाणे (10) : ब्रह्मांड आझादनगर येथील मद्रास चाळीत घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन जण जखमी तर एक 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. दुर्घटनाग्रस्त ठिकाणाची पाहणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली असून आजूबाजूच्या नागरिकांना तात्काळ स्थलांतरीत करणे व रुग्णालयात उपचार घेत जखमींचा खर्च करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

        यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक व स्थानिक नगरसेविका मीनाक्षी शिंदे, पद्मा भगत, लहू पाटील, विक्रांत वायचळ, प्रशांत जाधवर यांच्यासह उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त सोनल काळे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, कार्यकारी अभियंता संजय कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, अग्निशमन विभागाचे अधिकारी तसेच टीडीआरएफचे जवान आदी उपस्थित होते.

        या दुर्घटनेत उर्मिला जयस्वार (32 वर्षे), विनीतकुमार जयस्वार (8 वर्षे) अशी जखमींची नावे असून मृत जयकुमार जयस्वार (10) वर्ष असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. आझादनगर येथील मद्रास चाळ येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करताना आजूबाजूच्या नागरिकांना तात्काळ इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. नागरिकांचे स्थलांतर करताना त्यांना सर्वतोपरी सर्व सहकार्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने करावे असेही त्यांनी नमूद केले.  तसेच टायटन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेतली. तसेच सिव्हील रुग्णालयात जावून डॉक्‌टरांची भेट घेवून मृत्यू झालेल्या 12 वर्षीय मुलांचा मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना केल्या.

Continue Reading

Previous: पावसाळा कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे :महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे सर्व अधिकाऱ्यांना निर्देश…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×