Skip to content
March 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीला विजेतेपद….

डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीला विजेतेपद….

S9 TV NEWS January 3, 2026
IMG-20260103-WA0026.jpg
Like, Follow, Subscribe

रंगतदार लढतीत डी. वाय पाटील अकॅडमीने दिलीप वेंगसरकर फाउंडेशन संघाचा दोन फलंदाज राखून पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६ व्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी – २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने दिलेल्या १४० धावांचे आव्हान विजेत्या संघाने १९ षटकात १४४ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करताना फातिमा जाफर आणि पूनम राऊत यांनी दिलीप वेंगसरकर फाउंडेशन संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. फातिमाने ३४ आणि पूनमने ४५ धावा केल्या. या डावात मेगन रॉड्रिग्ज, प्रकाशिका नाईक आणि अक्षया शिंदेने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना हुमैरा काझीने अर्धशतक झळकवत संघाच्या विजयाचा पाया रचला. पण नंतर मधल्या फळीतील फलंदाज गडगडल्याने डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ अडचणीत सापडला होता. पण बिकट परिस्थितीत सायमा ठक्करने नाबाद ३० आणि सारिका कोळीने १५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रिद्धी ठक्करने चार बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले. अदिती सुर्वेने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक : दिलीप वेंगसरकर फाउंडेशन :२० षटकात ९ बाद १४०( पूनम राऊत ४५, फातिमा जाफर ३४, श्वेता कलपथी १७, मेगन रॉड्रिग्ज ४- ३३- २, प्रकाशिका नाईक ४- ३९- २, अक्षया शिंदे ३- १४- २) पराभूत विरुद्ध डी. वाय.पाटील स्पोर्ट्स अकॅडमी : १८.५ षटकात ८ बाद १४४ ( हुमैरा काझी ६९, सायमा ठक्कर नाबाद ३०, सारिका कोळी १५, रिद्धी ठक्कर ४- ३४- ४, अदिती सुर्वे ४- २७- २). डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी २ फलंदाज राखून विजयी.
वैयक्तिक बक्षिसे : उदयोन्मुख यष्टिरक्षक – काश्वी होसाळकर. सर्वोत्तम यष्टिरक्षक – मृणाल माने, सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – हुमैरा काझी, सर्वोत्तम गोलंदाज – अक्षया शिंदे, सर्वोत्तम फलंदाज – हुमैरा काझी, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – फातिमा जाफर, सर्वोत्तम झेल – मंजिरी गावडे, फातिमा जाफर, सिद्धी पवार.

Continue Reading

Previous: भाजपच्या कोकण विभाग मीडिया सेंटरचे ठाण्यात उद्घाटन
Next: मराठी भाषा ही आपली ओळख आणि अस्तित्व आहे….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×