बापट ढाल क्रिकेट स्पर्धा
स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनचा सहा विकेट आणि तीन षटके राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित टी – २० ६७ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने दिलेले १३३ धावांचे आव्हान स्पोर्ट्स फिल्डने १७ षटकात १३४ धावा करत पार केले.
प्रथम फलंदाजी करताना युनायटेडच्या प्रतीक गोतसुर्वेची ४५ धावांची खेळी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या डावात शुभम पाठकने चार, केतन जोशी आणि रोहिल जाधवने प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना झिशान चौधरीने नाबाद ३१, यश पैने ३१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. भाविक पटेलने दोन बळी मिळवले.
पारितोषिक वितरणप्रसंगी युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनचे कार्यवाह संगम लाड यांना १८ व्या जी.एस. वैद्य स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रो.डॉ उन्मेष खानविलकर, नदीम मेमन, संदिप विचारे, प्रमोद यादव, निल सावंत, यजमान संस्थेचे अध्यक्ष डॉ नासिर दवे, कार्यवाह दाऊद खान आदी उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन: २० षटकात ९ बाद १३३ ( प्रतीक गोतसुर्वे ४५, शुभम पाठक ४-०-२७-४, केतन जोशी ३-१-१२-३,रोहिल जाधव ३-०-२०-३) पराभूत विरुद्ध स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब : १७ षटकात ४ बाद १३४ ( झिशान चौधरी नाबाद ३१, यश पैं ३१, भाविक पटेल ४-०-२४-२).
सामनावीर – केतन जोशी ( स्पोर्ट्स फिल्ड).
एकमेव हॅटट्रिक – जश पांचाळ (नवरोझ क्रिकेट क्लब).
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – यश पैं (स्पोर्ट्स फिल्ड)
सर्वोत्तम फलंदाज – अजिंक्य पवार ( अणुशक्ती नगर स्पोर्ट्स क्लब).
सर्वोत्तम गोलंदाज – केतन जोशी ( स्पोर्ट्स फिल्ड).